सावली( तालुका प्रतिनिधी)
दि.१०/०६/२०२४ रोजी साय ठिक ७-०० वा.नुतन बाल नाट्य केवट समाज बहुउद्देशीय सेवा मंडळ सावली संचालीत महर्षी वाल्मिकी अभ्यासिका सावली द्वारा सन २०२३-२०२४ मधील माहे फेब/मार्च २०२४ च्या परीक्षेमधील इ.१० वी व १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम महर्षी वाल्मिकी अभ्यासिका सावली या ठिकाणी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाकरजी भंडारे जेष्ठ नागरिक तर प्रमुख पाहुणे सौ. ज्योती उमेंद्र शिंदे नगरसेविका सावली ,सौ.ज्योती बालाजी गेडाम नगरसेविका,दिलीप केशवराव शिंदे मुल, सावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरज बोम्मावार, सुदाम राऊत, पत्रुजी गेडाम ,राजेश राऊत, वसंत मारभते उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजिनिअर गुलाब गेडाम यांनी केले.यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन संजय कस्तुरे शिक्षक ,सौ.आशाताईं राऊत(कृषी सेविका), प्रशांत भंडारे शिक्षक आमडी, श्रवण शिंदे यांनी केले.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थी इयत्ता १० वी कु.प्राची गुलाब गेडाम(सावली तालुका प्रथम क्रमांक प्राप्त) कु.स्नेहा सुभास भंडारे,कु.स्नेहा भास्कर मराठे,कु.अंजली हिराचंद गद्देकार,कु.सुप्रिया दिलीप गेडाम, कु. श्वेता अनिल राऊत, हर्षद प्रकाश कलसार, संदिप सोमनाथ गेडाम ,जय दिलीप राऊत, इयत्ता १२ वी कु.जयश्री सुदाम राऊत, कु.श्रुतिका ईश्वर गद्देकार,कु. ख़ुशी विनोद मराठे, कु.स्नेहल अजय शिंदे, कु.तेजल गंगाधर सरपे,कु.धनश्री यादव राऊत ,कुणाल केशव गेडाम,उदय उमेंद्र शिंदे, हर्षद टटू भंडारे, साहिल हरिदास कस्तुरे,आदित्य विजय राऊत या सर्व विद्यर्थ्याना शिल्ड व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले. व पुढील वाटचालीस सर्वाना शुभेच्छ्या देण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रफुल्ल राऊत यांनी केले तर आभार दिपक राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश शिंदे अध्यक्ष, श्रीमती वनिता गेडाम उपाध्यक्षा, नारायणजी गेडाम सचिव, संतोष कस्तुरे सहसचिव, श्रीमती रंजना गेडाम सदस्या, श्रीमती शिलाताई शिंदे सदस्या, श्रीमती मंगलाताई मंडरे, चंद्रशेखर देऊरघरे, संगम गेडाम व समस्त केवट समाज बांधव यांनी अथक परिश्रम घेतले.








