जलजीवन योजनेच्या कामांना गती द्या-वडेट्टीवार यांची आढावा सभेत सूचना

359

जलजीवन योजनेच्या कामांना गती द्या-वडेट्टीवार यांची आढावा सभेत सूचना

सावली(सूरज बोम्मावार)पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अंतर्गत जलजीवन मिशन अंतर्गत योजना गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच गाव अंतर्गत पाईपलाईन टाकताना रोड फोडल्या गेलेले आहेत ते रोड संबंधित कंत्राटदाराने दुरुस्त करून द्यावे अशाही सूचना देण्यात आल्या. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री शेत पानंद रस्त्याची कामे गतीने पूर्ण व्हावी याकरिता उपविभागीय अभियंता जि प बांधकाम यांनी चालू कामास भेटी देण्याचे निर्देश ना विजय वडेट्टीवार यांनी दिले.


ना.विजय वडेट्टीवार आमदार ब्रह्मपुरी-सावली विधानसभा मतदारक्षेत्र तथा विरोधी पक्ष नेता विधानसभा महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 10 जून 2024 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह पंचायत समिती सावली येथे दुपारी तीन वाजता तालुकास्तरावरील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. सावली तालुक्याचे तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी पुष्पगुच्छ देऊन तर पंचायत समिती सावलीचे गटविकास अधिकारी मधुकर वासनिक यांनी महात्मा गांधीजींचे आत्मचरित्र भेट देऊन विरोधी पक्षनेते यांचे स्वागत केले.


जन सुविधा अंतर्गत पूर्ण करण्यात आलेली ग्रामपंचायत भवन,सीसी नाली, सीसी रोड स्मशानभूमी सौंदर्यकरण इत्यादी कामे पूर्ण केल्याबाबत पंचायत विभागाचे कौतुक केले . घरकुल योजनेअंतर्गत घरे पूर्ण होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले तर यशवंतराव चव्हाण आवास योजनेअंतर्गत घरकुलांचे स्थळ पंचनामे करून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना तसा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश विठ्ठल मुरकुटे यांना दिले. जि प बांधकाम विभाग अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे व गुणवत्ता पूर्ण कामे करण्याचे निर्देश उपविभागीय अभियंता जि प बांधकाम राजकुमार गेडाम यांना देण्यात आले. शिक्षण आणि महिला व बालकल्याण विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला. अंगणवाडीची बांधकामे, वर्ग खोलीची बांधकामे आगामी पावसाळापूर्वी पूर्ण करण्याबाबतचे निर्देश बांधकाम विभागाला देण्यात आले.

लाईन डिपार्टमेंटच्या कार्यान्वयीन यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका कृषी अधिकारी, गोसेखुर्द प्रकल्प, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक यांना कामाच्या अंमलबजावणी बाबत निर्देश देण्यात आले. शेवटी पंचायत समितीच्या प्रांगणात वृक्षारोपण करून सभेची सांगता करण्यात आली. सदर आढावा सभेचे आभार प्रदर्शन राजू परसावार विस्तार अधिकारी पंचायत यांनी केले.