झोपेत असलेल्या पत्नीवर कुर्हाडीने वार करून केले ठार

335

 

आरोपी पती फरार,गोंडपीपरी तालुक्यातील वेडगाव येथील घटना
राजुरा(संतोष कुंदोजवार)-
घरात मुले नसल्याची संधी साधून मध्यरात्री पतीनेच पत्नीच्या गळ्यावर कुर्हाडीने सपासप वार करून ठार केल्याची दुर्दैवी घटना दिनांक 16 फेब्रुवारी रोजी घडली असून आरोपी पती फरार झाला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पतीचा शोध घेत आहे
गोंडपीपरी तालुक्यातील वेडगाव येथे दोन मुले पती पत्नी असा दामोदर धुडसे यांचा सुंदर संसार होता परंतु दामोदर च्या मनात अचानक राक्षसी प्रवृत्ती जागी झाली त्याच्या डोक्यात वेगळेच विचार करीत होता आज दिनांक 16 चे रात्री मोठा मुलगा गावातील एका शेतकर्याचे घरी मजुरीने कापूस भरण्यासाठी गेला तर दुसरा मुलगा मित्राचे घरी झोपायला गेला होता आणि घरी पती दामोदर धुडसे वय 48 वर्ष आणि पत्नी लता धुडसे वय 40 वर्ष हे दोघेच होते मध्यरात्रीच्या सुमारास दामोदरनी झोपेत असलेल्या पत्नीच्या गळ्यावर कुर्हाडीने सपासप वार करून जागीच ठार केले आणि पळून गेला घटनेच्या काही वेळानंतर मोठा मुलगा घरी येऊन पाहताच त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडून दिसली लगेच त्याने लहान भावाला व शेजारील लोकांना बोलाविले वडिलांचा शोध घेतला परंतु वडील आढळून आले नाही याची माहिती लाठी पोलीस ठाण्यास देण्यात आली माहिती मिळताच ठाणेदार युवराज सहारे आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचून कारवाई सुरू केली दरम्यान घटनास्थळास पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन,अतिरिक्त पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनीही भेट दिली श्वान पथकाचे मदतीने आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे
या घटने प्रकरणी लाठी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करन्यात आला असून खून करण्याचे कारण काय असावे तसेच फरार झालेल्या आरोपी पतीचा पोलिस शोध घेत आहे
या घटने बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे