व्याहाड बुज येथे क्रिकेट सामन्याचे निखिल सुरमवार यांच्या हस्ते उदघाटन
श्री शिवछत्रपती युवा बहुउद्देशीय संस्था व्याहाड बुज.च्या वतीने आज व्याहाड बूज. येथे भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते .
या क्रिकेट सामन्यामध्ये प्रथम बक्षीस विजय भाऊ वडेट्टीवार यांचे तर्फे प्रथम बक्षीस १ लाख रुपये तर द्वितीय पुरस्कार खासदार अशोकजी नेते साहेब यांच्यातर्फे 71 हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार 41 हजार रुपये असे आहे.
या क्रिकेट सामन्याचे आज दि. १५ फरवरी रोजी उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल सुरमवार यांच्या हस्ते पार पडले . या उद्घाटनाचे अध्यक्ष किसान सहकारी तांदूळ गिरणी चे अध्यक्ष सुनील बोमनवार हे होते .
तर प्रमुख पाहुणे म्हणून या उद्घाटनाला लाभलेले महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ सावलीचे अध्यक्ष अनिल गुरनुले , सामाजिक कार्यकर्ते दीपक गद्देवार , जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते जयंत भाऊ संगीडवार , संदीप इंगुलवार , सुरेशजी वाढई , ओमप्रकाश सहारे , उपसरपंच परशुराम भोयर , ग्रा. प. सदस्य धनू गुरनुले , दिवाकर म्याकलवार आदी मान्यवर उपस्थित होते.









