सावली- रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय आणि माऊंट विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,त्या अनुषंगाने कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती शिक्षण प्रसारक संस्था सावलीचे विद्यमान संस्था सचिव प्रा.सौ.विशाखाताई चंद्रकांत गेडाम यांनी आपले स्थान भुषविले.या कार्यक्रमाला माजी संचालक आर.के.गेडाम , डॉ.एच.जे.दुधे,प्रा.एन.एल शेंडे सर,प्रा.पी.जी.रामटेके, पर्यवेक्षक एम.डि.लाकडे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.तारिका लाडे चंद्रपूर व धर्मानंद मेश्राम उपस्थित होते.
प्रथम शांतीदूत तथागत गौतम बुद्ध ,महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले व त्यानंतर बुद्ध धम्म आणि संघ वंदना घेण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य एन.एल.शेंडे सर यांनी केले.










