सावली तालुक्यातील सामदा -वाघोली घाटावरून रात्रौ -दिवसा रेती वाहतूकदारांनी रेती वाहतुकीचा सपाटा लावला असून प्रशासनाला मिळणाऱ्या लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे. विना परवाना रेती वाहतूकदारानी खुले आम रेती वाहतूक करण्यास सुरवात केली असून महसूल विभागाला “एंट्री “दिल्यावर भीती कुणाची अशा चर्चा चौका-चौकात करीत आहेत. सामदा -वाघोली घाटावरुन रेती वाहतूक करण्याकरिता जवळपास 10-12 ट्रॅकटर नी एकावेळेस रेती वाहतूक होत असल्याची माहिती आहे.
सावली तालुका हा अवैध रेती वाहतूकसाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असून तालुक्यात असणाऱ्या काही रेती घाटाना रेती वाहतुकीचा परवाना आहे. तसेच तालुक्यात सिंचन विभाग, घरकुल याचे बांधकाम मोठ्या प्रमाणावर सुरु असून मोठया प्रमाणात रेती ची विनपरवाना वाहतूक सुरु आहे. कित्येक रेती वाहतूकदार एकाच परवान्यावर दिवसभर रेती वाहतूक करीत असताना सुद्धा महसूल विभाग त्यांच्या कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नागरिकात होत आहे. सतत रात्र -दिवस चालणाऱ्या अवैध रेती च्या जड वाहतुकीने सावली तालुक्यातील अनेक रस्त्याची “वाट “लागली असून महसूल प्रशासन मात्र साखर झोपेत आहे हे विशेष.
सावली तालुका हा अवैध रेती वाहतूकसाठी प्रसिद्ध असून सध्या स्थितीत तरी महसूल विभाग आणी वाहतूक दार यांच्यात “‘तेरी भी चूप.. मेरी भी चूप “कारभार सुरु आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक सूरू असताना महसूल विभाग मात्र एखाद्यावेळेस एखाद्या अवैध रेती वाहतूक दाराच्या वाहणावर दांडात्मक कारवाही करून प्रशासनाला व्यवस्थित कारभार सूरू असल्याचा दिखावा करतो हे खास.वैध खनिज वाहतूक ही प्रशासनाच्या नियमाप्रमाणे सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीतच व्हायला पाहिजे परंतु चोरी करून खनिज वाहतूक करणाऱ्यानी दिवस -रात्रौ एक करीत व्याहाड बुज परिसरातून खनिज वाहतुकीचा सपाटा लावला आहे. प्रशासनातील अधिकारी वर्गच चोरीची खनिज वाहतूकदाराला पाठिंबा देतं असल्याने प्रशासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे








