ग्रीन आर्मी पुरस्काराने राकेश कोंडबतूनवार जयपूर येथे सन्मानित

537

वृक्षारोपण च्या कार्यात नेहमी तत्पर असलेल्या ग्रीन आर्मी महाराष्ट्र मध्ये सोशल मिडियाचा माध्यमातून वनविभागाची प्रसिद्धी केली तसेच वृक्षलागवड संदर्भात जनजागृती केली याची दखल घेत श्री कल्पतरू संस्थान जयपूर ( राजस्थान )च्या वतीने आयोजित दिनांक 6 मे 2026 रोजी संपन्न झालेल्या वृक्ष मित्र संमेलन कार्यक्रमात प्रसिध्द अभिनेत्री, पद्मश्री रविना टंडन,माजी वनमंत्री,आमदार सुधीर मुनगंटीवार, विष्णू लांबा यांच्या शुभहस्ते सावली येथील सोशल मीडिया प्रमुख राकेश कोंडबतुनवार यांचा जयपूर येथे सन्मान करण्यात आला.


राकेश कोंडबतुनवार यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे संचालक,भाजपा युवा नेता रोहित बोम्मावार, भाजपा तालुका अध्यक्ष किशोर वाकुळकर, तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार, नगरसेविका नीलम सुरमवार, नगरसेविका शारदा गुरुनुले,शहराध्यक्ष आशिष कार्लेकर,निखिल सुरमवार, राहुल लोडेल्लीवार, गौरव संतोषवार,राकेश विरमलवार,आशिष संतोषवार,प्रसाद जकुलवार,इम्रान शेख,अमरदीप कोनपत्तीवार,भोगेश्वर मोहूर्ले,प्रदीप येनूरवार, राजू बुरीवार,मयूर व्यास,मयूर गुरुनुले या पदाधिकारी सह अनेक कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.