शासन निर्णय व निर्देशानुसार विषय शिक्षक -उच्चश्रेणी मुख्याध्यापक – केंद्रप्रमुख -शिक्षण विस्तार अधिकारी पदांची पदोन्नती प्रक्रिया राबवा.
:::: पुरोगामी शिक्षक समितीची मागणी…
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कार्यरत शाळांमध्ये विषय शिक्षक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक व पर्यवेक्षकीय यंत्रणेतील केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी ची बरीच पदे रिक्त आहेत… या पदांचा प्रभार प्राथमिक शिक्षकांकडे असल्याने याचा विपरीत परिणाम शैक्षणिक व प्रशासकीय बाबीवर होत आहे. अध्यापनाचे व शाळा भेटीची कामे वेळेत व व्यवस्थित होत नसल्याचे दिसून येत आहे.आजमितीस विषय शिक्षक ६०-७० , उच्च श्रेणी मुख्याध्यापक ६०-८०, केंद्रप्रमुख ४०-५०, शिक्षण विस्तार अधिकारी १५-१७ पदे रिक्त असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांना या प्रमुख पदांचा प्रभार सांभाळताना तारेवरची कसरत करीत प्रशासनाला सहकार्य करावे लागत आहे..
शाळेचा प्रमुख म्हणून उच्च श्रेणी मुख्याध्यापकाला वर्षातील सर्व कामाचे नियोजन करताना दमछाक होत असते.त्यामध्येच सदर पदाचा प्रभार सांभाळून काम करीत असलेला प्राथमिक शिक्षक कसा न्याय देईल असा यक्षप्रश्न उभा आहे? तसेच शासनाचे आँनलाईन चे रोजचे कामे तर मुख्याध्यापकाची झोप उडवलेली आहे… या ताणतणावातून मुक्त करण्यासाठी व पर्यवेक्षकीय यंत्रणेचे काम नीटनेटके होण्यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूर शिक्षण विभागाने शासन निर्णय व निर्देशानुसार विषय शिक्षक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी या पदाची पदोन्नती प्रक्रिया त्वरीत राबवावी अशी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा चंद्रपूर चे शिष्टमंडळ यांनी देवराव भोंगळे आमदार राजुरा विधानसभा यांचे कडे निवेदनाद्वारे मागणी केली असून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावदादा भोंगळे यांनी तातडीने पदोन्नती चे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचेकडे पाठविले आहे…
निवेदन देतांना महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती चे राज्य नेते विजय भोगेकर, जिल्हा सरचिटणीस सुरेश गिलोरकर, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, जिल्हा कोषाध्यक्ष सुनिल कोहपरे, जिल्हा कार्यालयीन सचिव दिवाकर वाघे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष अडवे, संदिप कोंडेकर, सुनिल जाधव,लिंगोराव सोयाम,विक्रम ताळे, परशुराम पिंपळकर, सुरेश बोंडे,रामरतन चापडे, इरफान शेख,सुधीर धवस,सुधीर अलाम, शंकर वाघमारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती असे प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी कळविले आहे..








