नगरसेवक सतीश बोम्मावार यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र दिनापासून पाणपोई ला सुरुवात

3202

सावली नगर पंचायत चे कर्तव्य दक्ष नगरसेवक, विरोधी गट नेता तथा सावली तालुका भाजपा महामंत्री सतीशभाऊ बोम्मावार यांच्या पुढाकारातून जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर-गडचिरोली मुख्य मार्गावरील प्रभाग क्र. 02 येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ थंड कॅन पानपौई चे उदघाटन करण्यात आले.

या पाणपोई चे उद्घाटन या प्रभागातील नगरसेवक प्रितम गेडाम तथा जय किसान चे अध्यक्ष प्रकाश पाटील गड्डमवार यांचे हस्ते करण्यात आले.मागील वर्षी सुद्धा या उपक्रमाचा अनेक नागरिकांनी तसेच प्रवाशांनी लाभ घेतला. या वर्षी ही नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.कोविड च्या काळातही मोफत मास्क व स्यानिटायझर वाटप करणे व रुग्णांना मदत करण्याचे काम सतिश बोम्मावार यांनी केले होते.

या पाणपोई उदघाटन प्रसंगी माजी नगरसेवक चंद्रकांत संतोषवार,विनोद वाळके, माजी संचालक बाजार समिती सुनील गेडाम, राहुल लोडेलीवार, धर्मेंद्र बोरकर, मनोज अमरोजवार, सुदर्शन चामलवार, अनिल माचेवार ग्रामपंचायत सदस्य खेडी,राजेश रापेल्लीवार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते व उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.