सावली(तालुका प्रतिनिधी)
शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून व्याहाड खुर्द येथील जनतेला घरकुलाचा लाभ मंजूर झाला असल्यामुळे जुनी वस्तीची घरे पाळून त्याठिकाणी मंजूर असलेले घरकुल बांधकाम सुरु केले आहेत. परंतु पायव्याचे बांधकाम झाले असून वरील बांधकामाकरिता रेती (वाळू) मिळत नसल्यामुळे घराचे बांधकाम अर्धवठ अवस्थेत आहेत.
एक महिन्यात पावसाळा सुरुवात होणार आहे घरांचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे अनेकांची कुटुंब उघड्यावर पडलेले आहे. घरांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीचे कर्मचारी तसेच ग्रामसेवक हि वारंवार भेटी देऊन बांधकाम पूर्ण करावे असे सांगतात परंतु रेती मिळत नसल्यामुळे घरांचे बांधकाम करायचे कसे असा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी शासकीय धोरणानुसार मिळणारी ५ ब्रास रेती हि लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावली तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.यावेळी मारोती बाबनवाडे,दीपक जवादे,दशरथ कांबडे, सुदेश मलोडे, सुरेश कन्नाके,शालीक कांबडे,वैशाली ठाकरे,यशोदा काटकर, सुरेश सहारे यांच्या अनेक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








