सावली कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणूकिमधे कांग्रेस समर्थक एकतर्फी विजय संपादन केल्या नंतर मातब्बर संचालक यांना डावलून आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिनांक २५ एप्रिल २०२५ ला सावली बाजार समितीच्या सभापतीपदी राजू ठाकरे तर उपसभापतीपदी प्रमोद दाजगाये यांचे पुढे केले त्यामुळे ठाकरे व दाजगाये नावावर एकमत करीत अविरोध निवड करण्यात आली.

सावली कृषी उत्पन्न बाजार समिती करीता सेवा सहकारी संस्था क्षेत्रातील सर्वसाधारण गटातून शेतकरी परिवर्तन आघाडीचे अनिल स्वामी, नितीन गोहने, नामदेव ननावरे, राकेश गडमवार, हिवराज शेरकी, राजू ठाकरे, नरेश सुरमवार, इतर मागास प्रवर्ग गटातील निखिल नरेश सुरमवार, विमुक्त जाती भटक्या जमाती विभागातील प्रमोद दाजगाये, महिला आरक्षण गटातून कांताबाई बोरकुटे, नंदाताई आभारे निवडून आले. ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून केशव भरडकर, सुनिल बोमनवार, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती गटातून अरविंद भैसारे विजयी झाले. व्यापारी गटातून प्रशांत चिटनूरवार व सचिन तंगडपल्लीवार तर मापारी हमाल गटातून मारोती सहारे ह्या संचालकांचा समावेश होता करिता नवनियुक्त संचालकातुन
सभापती व उपसभापती यांची निवडणूक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली येथे पार पडली त्यात एकमताने सभापतीपदी राजू ठाकरे तर उपसभापतीपदी प्रमोद दाजगाये यांची निवड करण्यात आली.

कांग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार ,जेष्ठ नेते संदिप गडमवार, जेष्ठ नेते दिनेश चिटनूरवार यांच्या सह अनेकांनी सभापती राजू ठाकरे व उपसभापती प्रमोद दाजगाये यांचे अभिनंदन केले.निवडणूक अधिकारी एल.आर.वानखेडे यांनी काम पाहिले.








