लोखंडी गेट अंगावर पडल्याने बालिकेचा मृत्यू;सर्वत्र हळहळ

5224

लोखंडी गेट अंगावर पडल्याने बालिकेचा मृत्यू;सर्वत्र हळहळ

सावली येथील आरोग्य विभागात असलेले कर्मचारी मुकेश शिंगाडे यांची नववर्षीय कन्या कु. अमूल्या ही आपल्या नातेवाईकाच्या घरी गेली असताना खेळत असतानाच तिचा अंगावर चक्क लोखंडी गेट पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे दुःखदायक घटना आज दिनांक 14 एप्रिलचा सकाळी घडलेली आहे.

सदर घटनेनंतर त्या मुलीला सावली येथे आणण्यात आले असून एकच परिवाराचा टाहो फुटलेला आहे. आरोग्य विभागामध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले मुकेश शिंगाडे यांच्या पत्नी चे नातेवाईक यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील तेजापूर येथे भटवलकर या नातेवाईकाच्या घरी लग्न कार्यक्रम होता या कार्यक्रमासाठी कु. अमूल्या ही आपल्या आई सोबत गेली होती.आज ती सकाळी गेटला धरून खेळत असताना चक्क गेटच तिच्या अंगावर पडला त्यात ती गंभीर जखमी झाली तिला उपचारासाठी वणी येथे भरती करताच मृत्यू झाल्याचे सांगितले.

 

घटनेची माहिती सावली ते माहिती होताच सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरले आज दुपारच्या सुमारास त्या मुलीचा मृतदेह सावली त्यांना असून तिच्यावर उदयाला दिनांक 15 ला सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या दुर्दैवी घटनांना मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. कुमारी अमूल्या ही तिसऱ्या वर्गात राणी यशोधरा कान्व्हेंट सावली येथे शिकत आहे.तिच्या मृत्यूने शिंगाळे परिवारावर दुःखाचे डोंगर पसरले आहे.