सावली कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकीत 70 जणांचे नामांकन दाखल

1229

सावली कृषी उत्पन्न बाजार समिती ची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज दिनांक 7 ला शेवटच्या दिवशी एकूण 70 जणांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे. सन 2025 ते 2030 या पाच वर्षीय कालावधीसाठी सावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक पार पडत आहे.त्या करिता एकूण 18 संचालकांची निवड करायची असून यात एकूण 70 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहे.

 

यात सेवा सहकारी गटातून 11 जागेसाठी 48 जणांनी नामांकन दाखल केले आहे.तर ग्रामपंचायत गटातून 4 जागेसाठी 13 जणांनी तर व्यापारी गटातून 2 जागेसाठी 6 जणांनी तर मापारी 1जागेसाठी 3 जणांनी नामांकन अर्ज सादर केले.दिनांक 10 ला सकाळी 11 वाजे नंतर ला सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी केल्यानंतर दिनांक 25 मार्च ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. दिनांक 25 नंतरच कोणत्या गटातून किती उमेदवार उभे राहतात हे चित्र स्पष्ट दिसणार आहे. सध्या तरी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षातील सदस्यांनी आपापली उमेदवारी अर्ज दाखल करून या निवडणुकीला चुरस आणण्याचे दिसून येत आहे मात्र येणाऱ्या काळ लक्षात घेता निवडणूक ही अविरोध व्हावी असं दोन्हीही पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे असून नेमकं काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.