सावली शहर मित्र परिवार च्या वतीने आयोजन
सावली शहरातील 1 ते 17 प्रभागातील युवा व युवतींना खेळण्यासाठी क्रिकेटचा महाकुंभ तयार करून देण्यात आलेला असून दिनांक 1 फेब्रुवारी पासून सावली प्रिमियम लीग ला सुरुवात होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून सावली शहरात सावली नगरपंचायत चषक चे आयोजन करण्यात येत होते मात्र या वर्षी याला बगल देत सावली मित्र परिवाराणे या क्रिकेट स्पर्धचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 15000 रोख व शिल्ड मा. रोहितभाऊ बोम्मावार,अध्यक्ष साथ फाउंडेशन यांच्या कडून तर द्वितीय पारितोषिक 11000 रोख व शिल्ड मा. रविंद्रभाऊ ताटकोंडावार व्यंकटेश ज्वेलर्स व्याहाड खुर्द यांच्या कडून आहे.तर तृतीय पारितोषिक 7000 टोख व शिल्ड श्री. विलासभाऊ यासलवार माजी नगराध्यक्ष न. पं. सावली यांच्या कडून आहे.
तसेच महिला विभाग साठी
प्रथम पारितोषिक 7000 रोख व शिल्ड मा. लताताई लाकडे नगराध्यक्ष न. पं. सावली यांच्या कडून तर द्वितीय पारितोषिक 5000 रोख व शिल्ड मा. अखिलभाऊ तायडे इंजीनियर & कांट्रेक्टर गडचिटोली आणि तृतीय पारितोषिक 3000 रोख व शिल्ड मा. लक्ष्मीकांत दमकोंडावार लक्की ज्वेलर्स सावली
यांच्या कडून आहे.तसेच 1 ते 17 प्रभागासाठी टीम चे प्रायोजक नेमण्यात आले आहे.त्यामुळे सावली शहरात दिनांक 1 फेब्रुवारी 2025 पासून अंतिम सामन्यापर्यंत संत श्री योगिनारायण बाबा स्टेडियम मध्ये आयोजन केले आहे.यात मोठ्या प्रमाणात युवक/युवतींनी सहभागी असे आवाहन आयोजक सावली शहर मित्र परिवार यांनी केले आहे.








