तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धेत कापसी शाळा एकपात्री व वादविवाद स्पर्धेत अव्वल

641

 

 

पंचायत समिती सावली अन्तर्गत तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धा नुकतेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाथरी येथे संपन्न झाले. या नवरत्न स्पर्धेत एकुण नऊ स्पर्धा घेण्यात आले. वादविवाद स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कापसी ची विद्यार्थिनी स्वामिनी नोमेश्वर ताडाम ही मोबाईल चा वापर योग्य की अयोग्य या विषयाचे अनुषंगाने मोबाईल चा वापर अयोग्य या बाजुने बोलून रसिकजणांचे मन जिंकून घेतले व परीक्षकांनी दिलेल्या गुणानुसार अव्वल ठरली. एकपात्री भुमिकाभिनय या स्पर्धेत देविका बंडु भांडेकर ही उत्कृष्ट अभिनय करुन अव्वल ठरली.

 

या दोन्ही रत्नांना बक्षीस देवून पंचायत समिती सावली चे गटशिक्षणाधिकारी मोरेश्वर बोंडे,किशोर बारसागडे शिक्षण विस्तार अधिकारी,शामराव बावणे शिक्षण विस्तार अधिकारी,राजेश ताकधट केन्द्र प्रमुख सामदा, किशोर येनगंटीवार केन्द्र प्रमुख, जगन्नाथ वाढई व गटसाधन केंद्राचे सर्व साधनव्यक्ती प्रमोद भोयर,बबीता चहांदे,नितीन रामटेके,संजय झाडे व इतर यांनी अभिनंदन केले आहे.

 

या यशासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उज्वला सातपुते,नितेश भांडेकर,सदानंद पिपरे,विलास कुकुडकर,हिराचंद परचाके,दशरथ परचाके, दशरथ भोयर,निलीमा सातपुते,सपना मोहुर्ले,माधुरी शेंडे,शशीकला सोयाम,वर्षा चापडे, शाळेचे शिक्षक सुनिता पे़दाम,गोपाल पेंदाम,मनिषा आसुटकर,भावना खानोरकर यांनी अथक परिश्रम व मार्गदर्शन केले.

वादविवाद व एकपात्री भुमिकाभिनय मध्ये मिळालेल्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक किशोरकुमार आनंदवार यांनी विजेते स्पर्धेक व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे। चौकटीत- वादविवाद स्पर्धा अव्वल- स्वामिनी नोमेश्वर ताडाम, एकपात्री भुमिकाभिनय अव्वल- देविका बंडु भांडेकर!!! मागील वर्षी सुद्धा या मुली नवरत्न स्पर्धेत अव्वल ठरलेल्या होत्या.