बांबू लागवड ह्या शासनाच्या विशेष महत्त्वकांक्षी अभियान यशस्वी होण्याच्या अनुषंगाने वातावरणात बदल व पर्यावरण रोखण्यासाठी तसेच वृक्ष लागवड बळकट करण्यासाठी ईश्र्वेद बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड च्या चंद्रपूर जिल्हा समन्वयक पदी राजू बोरकर यांची निवड करण्यात आली. समूहाचे अध्यक्ष डॉक्टर संजय वायाळ यांच्या सहीचे नियुक्तीपत्र त्यांना देऊन गौरविण्यात आले.
त्यांच्यावर संघटनेच्या बांधणीची व शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी काम करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्यांना पर्यावरण संवर्धनाबाबत प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणणे व हा मुख्य उद्देश आहे.
राजू बोरकर यांच्याकडून या क्षेत्रातील कार्याला नवीन दिशा मिळेल पर्यावरण रक्षण व शेतकऱ्यांच्या हितासाठी ते नवे उपक्रम राबवतील असा विश्वास आहे.








