ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत 1 ठार 2 गंभीर जखमी

330

सावलीवरून आठवडी बाजार करून जाणाऱ्या दुचाकी स्वाराला ट्रॅक्टरने जबर धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी ७.००वाजताच्या दरम्यान घडली.जखमीना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यातआलेअसून पुढील उपचार सुरू आहेत.

तालुक्यातील पारडी येथील ज्ञानदेव मधुकर भोयर २६ वर्ष,असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून,गंभीरजखमीमध्ये पुनिदास वासुदेव मडावी(४५),वामन नारायण गेडाम(५७) रुद्रापूर यांना गडचीरोलीच्या जील्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचाराकरिता भरती करण्यात आले आहे. सकाळी शेतातील धानबांधणी करून सायंकाळी ७.००वाजता आठवडी बाजार करून गावाकडे परत जात असताना रुद्रपूर फाट्याजवळील वळणावर वेगवान ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली.जखमीना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले असून पुढील तपास सावलीचे ठाणेदार प्रदीप पुल्लुरवार यांच्या मार्गदर्शनात सावली पोलीस करीत आहेत.