चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

1361

सावली व परिसरात भूकंपाचे सौम्य धक्का

आज सकाळी 7.29 ते 7.31 च्या वाजता दरम्यान सावली हादरली. भूकंपाचा सौम्य धक्का सावली व परिसरातील नागरिकांनी अनुभवला.

सकाळी 7.29 वाजता काही जण झोपून होते तर बरीच मंडळी उठली होती. आणि आपापल्या कामात लागली होती.

जनता आपल्या कामात असताना अचानक जमीन हलयाला लागली. जमिनीतून कंपन ऐकू येऊ लागले. पंखे हलत होते. खिडक्याची तावदाने वाजायला लागली. कपातील चहा हलू लागला. घरातील हलके भांडे सुद्धा पडले. या भीतीने काही लोक घरातून बाहेर यायला लागली आणि एकमेकांना विचारायला लागली.

याचा अनुभव सगळ्यांनी घेतल्याने सौम्य भूकंपावर शिक्कामोर्तब झाले.

महाराष्ट्र तेलंगणा सिमेजवळ भूकंपाचा जोरदार झटका. गोदावरी रिफ्ट भूकंपाचे कारण. भूकंपाचे धक्के चंद्रपूर पर्यंत जाणवले