आमदार विजय वडेट्टीवारांच्या शुभेच्छा बॅनर वरून नगराध्यक्ष, शहराध्यक्ष यांची फोटो गायब

3190

 

सावली शहरात कांग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीला उधाण!

सावली(सूरज बोम्मावार)
ब्रह्मपुरी -सावली विधानसभा क्षेत्रातून तिसऱ्यांदा मोठ्या मताने विजयी झालेले राज्याचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे मोठे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विजयाचे बॅनर सावली शहरात लागले असतानाच एका मोठ्या बॅनरने सावली शहरात काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी असल्याचे उघड झालेले आहे. याच गटबाजीचा कदाचित नुकसान वडेट्टीवारांना लीड मध्ये सहन करावा लागला असल्याचे बोलले जात आहे.

ब्रह्मपुरी- सावली विधानसभा क्षेत्रातून तब्बल तिसऱ्यांदा राजाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे महायुतीचे उमेदवार कृष्णा सहारे यांचा 14 हजारच्या मताधिक्याने विजयी झाले.राज्यात सर्वत्र कांग्रेस ची पळझळ सुरू असतांनाही वडेट्टीवार यांनी आपला बालेकिल्ला मजबूत ठेवला.

मात्र संदीप गड्डमवार, कृष्णा राऊत यांच्या पक्ष प्रवेशामुळे वडेट्टीवार किमान 35 हजार च्या लीड ने येणार अशी ही प्राथमिक माहिती सर्वत्र होती मात्र त्यात मोठी घट झाली मात्र याला जबाबदार कोण?असा प्रश्न ही उपस्थित होत आहे.

सावली शहरात नगरपंचायत वर कांग्रेस ची एक हाती सत्ता आहे. नगराध्यक्ष लताताई लाकडे व उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार हे कार्यरत आहे.मात्र या दोन पदाधिकारी मधेच गटबाजी असल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून उघड होते आहे.नगराध्यक्षा लाकडे यांच्या कडे 6 जण तर उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार यांच्याकडे 10 नगरसेवक असा मताधिक्य आहे.यांच्यातील सुरू असलेला राजकिय शह कट शह चा कलगीतुरा हा सद्या सावली शहरात चर्चिल्या जात होता. मात्र येन विधानसभा निवडणुकीच्या समोर आमदार विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही गटांना ब्रम्हपुरी येथे बोलावून समज दिल्याचे समजले.व काहींना शब्द दिल्याचे समजते.त्यानंतर लताताई लाकडे,संदीप पुण्यपकार सह सर्वच पदाधिकारी व नगरसेवक तथा कांग्रेस शहराध्यक्ष विजय मूत्यालवार,युवा अध्यक्ष अमर कोणपत्तीवार,महिला अध्यक्ष भारती चौधरी सह कार्यकर्ते हे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या साठी अहोरात्र मेहनत केली.

 

संपूर्ण सावली शहरात मिळून दिसल्याने आता वैर नसावा असाच समज सावलीकरांना झाला होता मात्र विजयभाऊ वडेट्टीवार हे निवडून येताच सावली शहरात एका बड्या मोठ्या ब्यानर वरून तब्बल नगराध्यक्ष लताताई लाडके,शहराध्यक्ष विजय मूत्यालवार,नगरसेवक सचिन संगीळवार,प्रफुल वाळके,अंतबोध बोरकर, राधा ताटकोंडावार यांच्या सह युवा व महिला शहर अध्यक्ष व जेष्ठ नेते यांचे फोटो वगळून नगरपंचायत उपाध्यक्ष संदीप पुण्यपवार यांच्या सह 9 नगरसेवकांची व कार्यकर्ते यांची फोटो असल्याचे ब्यानर लागले आहे.त्यामुळे काल पर्यंत एकत्र दिसणारे आज पुन्हा तुटले का?असा प्रश्न पडू लागलेला आहे.

तसेच या दोन गटामुळेच कदाचित आमदार विजय वडेट्टीवार यांना लोकसभे पेक्षा कमी लीड मिळाली असे ही बोलले जात आहे.मात्र यांच्यात दुरावा का आहे.आणि दोन्ही गटांची वडेट्टीवार यांनी काय समजूत घातली होती आणि कुणाला काय शब्द दिले होते असा ही प्रश्न या निमित्ताने चर्चिल्या जात आहे.सावली शहरात मोठया प्रमाणात कांग्रेस चे नेते व कार्यकर्ते आहे मात्र वडेट्टीवार यांच्या विजयाची विजयी रॅली ही गटबाजी मुळे अडकली का?असा प्रश्न ही या निमित्ताने पडू लागला आहे.
मात्र यावर आमदार विजय वडेट्टीवार हे काय फुंकर घालतात हे येणाऱ्या दिवसातच कळणार आहे.