नाराज गड्डमवार कांग्रेस समर्थकांची गुप्त बैठक;सन्मान जनक वागणूक द्या;अन्यथा डोंगा पलटी?

2821

काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या संदीपभाऊ गड्डमवार समर्थकांना योग्य तो न्याय दिला जात नसल्याचा आरोप करीत आज संदीपभाऊ गड्डमवार समर्थकांनी एक गुप्त बैठक घेतल्याची माहिती पुढे आलेली आहे.त्यामुळे कांग्रेस मध्ये सद्या काही आलबेल नाही असाच प्रकार या निमित्ताने पुढे आलेला असून ऐन विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सुरू असलेल्या रुसवे-फुगवे ने आमदार विजयभाऊ वडेट्टीवार नक्कीच संतापले असेलच.मात्र कार्यकर्त्यांना सन्मान दिले नाही तर त्याचा परिणाम येणाऱ्या निवडणूकित घडेल असे सुचक वक्तव्य काही गड्डमवार समर्थक करू लागले आहे.

तब्बल 2 वेळा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विरोधात विधानसभा लढून संदीपभाऊ गड्डमवार यांनी 3 वर्षांपूर्वी आता पुढे नको असे म्हणत कांग्रेस मध्ये गाजत वाजत प्रवेश केला.त्यामुळे ब्रम्हपुरी-सावली विधानसभा क्षेत्र आता कांग्रेस मय झाले असेच चित्र आहे. मात्र एवढे होऊनही भाजपाने आपला वजन अजूनही तेवढा ठेवला आहेच.संदीपभाऊ गड्डमवार यांची राजकीय ताकद ही मोठी आहे.हे अनेकांनी मान्य केले आहे.त्यांच्या जवळ आजही क्षेत्रात 25 ते 30 हजार चाहता मतदार आहे.तसेच कांग्रेस मध्ये प्रवेश केल्यावर ही शिवसेना चे खुद्द मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी संदीपभाऊ या आम्ही साम-दाम नी सोबत राहू असे बोलले असल्याचे कळते.मात्र गड्डमवार यांनी नकार दिल्याचे कळते आहे.

संदीपभाऊ गड्डमवार यांनी कांग्रेस मध्ये प्रवेश करून तीन वर्षे झाली मात्र अद्यापही कोणत्याही कार्यकर्त्यांना संघटेनच्या पदावर अथवा इतर लाभापासून वंचित आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय मिळणार की नाही असा प्रश्न यावेळी गड्डमवार समर्थकांनी उपस्थित केला आहे.सावली तालुक्यातील कांग्रेस च्या दोन-चार पदाधिकारी ने हे कार्यकर्ते वैतागले आहे.या कार्यकर्त्यांना कुठे बोलविले जात नाही.साधी विचारपूस करीत नाही.चर्चत सामावून घेतले जात नाही.तसेच करोडो रुपयांची कामे सुरू असतांना ही त्याचा कामाचा माध्यमातून लाभ दिल्या जात नाही.ठराविक दोन चार नेते करोडो ची कामे करतात ते तुपाशी आणि बाकीचे उपाशी अशी स्तिथी सावली तालुक्यातील कांग्रेस मध्ये झाल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केले.काही तालुका संघटनेचे पदाधिकारी हे स्वतःलाच वडेट्टीवार समजून काम करीत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केले.

ही खदखद अनेक दिवसांपासून कार्यकर्त्यांच्या मनात होती आणि ग्रामीण चे सर्व कार्यकर्ते एकत्र येत चकपिरंजी येथे बैठक आयोजित केले.आणि संदीपभाऊ तुम्ही बैठकीला या अन्यथा मोठा वेगळा निर्णय होईल असा इशारा संदीपभाऊ गड्डमवार यांना दिला त्यामुळे चंद्रपूर येथून संदीपभाऊ गड्डमवार हे कार्यक्रम स्थळी पोहचले व कार्यकर्ते च्या भावना समजून घेतल्या आणि आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या समोर नक्की भावना ठेवतो असे बोलले.मात्र समर्थकांमध्ये मोठी नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

संदीपभाऊ गड्डमवार यांच्या सोबत सावली तालुक्यातील जनता आजही मोठ्या प्रमाणात आहे.त्यांचा असलेला शांत स्वभाव हा अनेकांना आपलेसा करतो.त्यांचा तसा दबदबा आहे मात्र पक्ष प्रवेशाने नेते आता कार्यकर्ते झाले असेच सर्वत्र बोलल्या जात आहे.येणाऱ्या निवडणूकित सन्मानजनक वागणूक न मिळण्यास डोंगा पलटू शकतो अशी चर्चा अनेकांनी व्यक्त केली. या सर्वांवर आमदार विजयभाऊ वडेट्टीवार कसा निर्णय घेतात हे येणाऱ्या काळात कळेलच. मात्र सावली तालुक्यात विजयभाऊ वडेट्टीवार यांना आप्तस्वकीयाकडून जास्तच त्रास होतोय हे नक्की आहे.