*दि महाराष्ट्र अर्बन च्या 10 व्या वर्ष पूर्ती बद्दल केले आयोजन*
*सावली(तालुका प्रतिनिधी)*
दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेट सोसायटी लिमिटेड चंद्रपूर मुख्य कार्यालय सावलीचा अकराव्या वर्षात पदार्पण निमित्त दिनांक 1 सप्टेंबरला संस्थेच्या कार्यालयात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळी साडेसात वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली यावेळी सावलीचे नगराध्यक्ष लता लाकडे, नगरसेवक सतीश बोम्मावार,चंद्रपूर अर्बन चे अध्यक्ष रोहित बोम्मावार,जय किसान पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश गड्डमवार,पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे,डॉ.भास्कर सुकारे व इतर मान्यवर यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात केली.

“अखंड गतीतुन सार्थकता” साधत एक पाऊल पुढे टाकीत 1 सप्टेंबर 2024 ला 10 वर्ष पुर्ण होवून 11 व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने दि.1 सप्टेंबर ला संस्थेच्या कार्यालयात वार्षिक सभा सोबतच बक्षीस वितरण, कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चरणदास बोम्मावार, प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश गड्डमवार, देवराव मुद्दमवार,नगरसेवक सतीश बोम्मावार,रोहित बोम्मावार, संचालक अनुराग सुरमवार,प्रफुल चेनुरवार, विलास मुस्कावार, गोविंद तेलंग,गणेश बनलावार,ऍड धनंजय आंबटकर,डॉ.भास्कर सुकारे आदी जण मंचावर उपस्थित होते.
10 वी व 12 वीतील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था त्यात टायगर वन्यजीव रक्षक संस्था सावली महावीर इंटरनेशनल सावली, आपदा ग्रुप, समृद्ध निसर्ग फाऊंडेशन सावली यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थांचे नवनियुक्त संचालक ,अभिकर्ता, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. व अभिकर्ता व कर्मचारी यांचा 10 लाख रुपयांचा विमा संस्थेच्या वतीने देण्यात आला.

सावली मॅरेथॉन स्पर्धेत मुलांमधून प्रथम क्रमांक 3000 रोख,ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र हे गडचिरोली जिल्ह्यातील मूरखडा माल येथील नागेश्वर संजय रस्से यांनी पटकाविला.तर द्वितीय क्रमांक गडचिरोली येथील राजू भांडेकर यांनी पटकवला यांना 2000 रुपये रोख ट्रॉफी मेडल प्रमाणपत्र देण्यात आले तर तृतीय क्रमांक 1000 रुपये रोख ट्रॉफी प्रमाणपत्र चंद्रपूर येथील शिवाजी नंदकिशोर गोस्वामी यांनी पटकविला तर यावेळी प्रोत्साहन पर म्हणून प्रज्ञावंत उंदीरवाडे चंद्रपूर, रोशन बोदलकर मुरखडा यांना रोख बक्षीस देण्यात आले.
मुलींसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक 2000 ₹,ट्राफी,प्रमाणपत्र, मेडल अमरावती येथील निकिता विठ्ठल म्हात्रे यांनी पटकावीला तर द्वितीय क्रमांक 1500 रोख ,मेडल,ट्रॉफी प्रमाणपत्र चंद्रपूर येथील वैशाली विलास मालेकर हिने पटकावीला तर तृतीय क्रमांक 1000 रुपये रोख ट्रॉफी,मेडल, प्रमाणपत्र हे गडचांदूर येथील कुमारी पल्लवी शंकर कोटरंगे हिने पटकवीला तर प्रोत्साहन पर म्हणून तेजस्विनी ठाकरे गडीसुरला, खुशी तांगडे मुल या दोघांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला सर्व स्पर्धकांना दि महाराष्ट्र अर्बनच्या वतीने प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले.
याप्रसंगी 100 फळ झाडे वृक्षरोप चे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन सूरज बोम्मावार, अहवाल वाचन कु.आरजू कुंटेवार, तर आभार प्रफुल लाटकर यांनी मानले.यावेळी सभासद,अभिकर्ता,कर्मचारी उपस्थित होते.








