*संगायो अध्यक्ष प्रकाश पाटील गड्डमवार यांची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे मागणी*
तहसिलदार सावली यांचे आस्थापनेवर नायब तहसिलदार संवर्गाची एकुण 3 पदे मंजुर आहेत.
परंतु सावली तालुक्यात आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत मोठया प्रमाणात श्रावण बाळ निराधार योजना संजय गांधी निराधार योजना, व इतर योजना राबवीत असतांना तसेच कामकाज करीत असतांना सावली तालुक्यातील संजय गांधी योजनेकरीता 1 नायब तहसिलदाराचे पद निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.
नायब तहसिलदार संगायो पद नसल्याने कामकाजात बिल तपासण्यास तहसिलदार यांना व्यक्तीशा प्रत्येक वेळी लक्ष घालावे लागते.
त्यामुळे अतीरीक्त भार येत असल्याने सदर योजनेचे नियंत्रण व्यवस्थापन व नियोजन करण्यास अडचण निर्माण होते.
त्या करिता इतर तालुक्याप्रमाणे सावली तालुक्याला संजय गांधी / इंदिरा गांधी शाखेकरीता नायब तहसिलदार यांचे पद भरतीकरण्यात यावी अशी संगायो अध्यक्ष प्रकाश पाटील गड्डमवार यांन्नी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे मागणी केली आहे. तसेच राष्ट्रीय कुटुंब कल्याण आर्थिक सहायता या योजनेचे १०२ लाभार्थी निधी अभावी योजनेपासून वंचित असल्यामुळे या योजनेची निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.








