ब्रेकिंग न्यूज… वाघाच्या हल्यात गुराखी ठार

2611

 

सद्या वाघ व बिबट ने धुमाकूळ घालायला सुरूवात केली असून
सावली तालुक्यातील डोनाला येथिल जंगल परिसराला लागून असलेल्या ठिकाणी स्वतःचे गुरे राखणाऱ्या इसमा वर दब्बा धरुन असलेल्या वाघाने हल्ला करुन जागीच ठार केल्याची घटना आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली .

सदर घटनेची माहिती गावकरी यांनी वनविभाग ला सावली ला दिली असून घटनास्थळी वनविभागाची चम्मू उपस्थित झाले आहे. सदर व्यक्ति
आनंदजी वासेकर अंदाजे वय 50 वर्ष रा.डोनाला हा मृतावस्थेत आढळून आले असता मृतदेह शवविच्छेदना करिता सावली ग्रामीण रुग्णालयात नेले असून .

या जंगल परिसरात मोठ्या प्रामानात हिंसक प्राणी असून या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या हिंसक वाघाचा बंदोबस्त करा अशी मागणी डोनाळा ग्रामस्थांनी केली आहे.