वनपरिक्षेत्र सावली येथे 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

782

चंद्रपूर वनविभाग मधील सावली वनपरिक्षेत्रात विविध उपक्रमांतर्गत 1. वनसंरक्षण व संवर्धन, 2. मानव वन्यजीव संघर्ष, 3. जल व मृद संधारण या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. सदरचे स्पर्धेत संपूर्ण वन कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत श्री अतीन मानकर पाथरी यांनी प्रथम क्रमांक (प्रमाणपत्र, शील्ड व रोख रु. १० हजार), श्री सुधाकर बोनलवार वनरक्षक टेकाडी यांनी द्वितीय क्रमांक (प्रमाणपत्र, शील्ड व रोख रु. 5 हजार), श्री ज्ञानेश्वर सिडाम आणि कु. प्रिया शेंडे वनरक्षक गोलाभुज यांनी तृतीय क्रमांक (प्रमाणपत्र, शील्ड व रोख रु. ३ हजार) पटकाविला.

 

त्यानंतर सावली वनपरिक्षेत्रांतर्गत सर्पमित्र म्हणून काम करणाऱ्या 16 उत्कृष्ट सर्पमित्र यांना प्रमाणपत्र,शील्ड, टी-शर्ट व शूज वाटप करण्यात आले. त्यासोबतच वनविभागात वर्षभर वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे वन कर्मचारी व लोक सहभागातून वनसंरक्षण आणि संवर्धनाच्या कामात सहभाग वाढावा म्हणून संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सरपंच तंटामुक्त समितीचे पदाधिकारी तसेच इतर सहकार्य करणाऱ्या एकूण 64 क्षेत्रीय व कार्यालयीन वनकर्मचारी आणि गावकरी यांना प्रमाणपत्र तसेच शिल्ड देऊन गौरविण्यात आले.

याशिवाय वर्षभर वनाचे संरक्षण करताना कायद्याचे पुरेपूर ज्ञान असावे म्हणून संपूर्ण वन कर्मचाऱ्यास कायद्याची प्रत्येकी 3 पुस्तके, विभागीय ओळखपत्रे, शूज, व्हॉलीबॉल व बॅडमिंटन सारखे मैदानी खेळाचे साहित्याचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांनी केले असून श्री सतीश नागोसे वनरक्षक पेंढरी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता श्री श्रीराम आदे, वनरक्षक गेवरा, श्री लंकेश आखाडे वनरक्षक सादागड, श्री सुधाकर बोणालवार वनरक्षक टेकाडी यांनी सहकार्य केले.