सावली तालुका भारतीय जनता पार्टी कार्यकारणी चा कार्यकाळ संपून 2 वर्ष झाली त्यामुळे नवीन अध्यक्ष व महामंत्री कोण होणार या कडे लक्ष लागले असतानाच आज चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी सावली तालुका भारतीय जनता पार्टी च्या अध्यक्षपदी जेष्ठ भाजपा नेते अर्जुन भोयर यांची तर तालुका महामंत्री म्हणून सतीश बोम्मावार व सचिन तंगडपल्लीवार यांची निवड केल्याची घोषणा केली आहे.

सावली तालुका भाजपा अध्यक्ष पदावर अर्जुन भोयर यांची निवड करण्यात आली.अर्जुन भोयर हे चकपिरंजी येथील असून ते सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य असा कार्यकाळ त्यांनी 15 वर्ष केले.ते सावली तालुका भाजप कोषाध्यक्ष पदावर ही होते तसेच कुनबी समाज संघटनेच्या सावली तालुका अध्यक्षपदावरही आहेत.सामाजिक व राजकिय क्षेत्रात त्यांच्याकडे अनेक कामे आहेत.माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या काळापासून एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून अर्जुन भोयर यांचे तालुक्यात नाव आहे.

भाजपा तालुका महामंत्री म्हणून सतीश बोम्मावार यांची घोषणा केली आहे. सतीश बोम्मावार हे सावली नगरपंचायत प्रभाग क्र.14 चे नगरसेवक तसेच नप गटनेते आहेत.यापूर्वी ते 15 वर्षा पासून सावली ग्रामपंचायत वर सदस्य होते तसेच त्याच काळात काही वर्षे उपसरपंच होते.गेल्या 8 वर्षांपासून ते भाजप तालुका महामंत्री म्हणून काम करीत आहे.संजय गांधी निराधार योजनेचे ते 6 वर्ष तालुका अध्यक्षही होते.आताही समितीवर आहेत.सामजिक व राजकिय विविध पदावर त्यांनी काम केले आहे.व त्यांची तालुका महामंत्री म्हणून पुन्हा तिसऱ्यांदा निवड केली आहे.

सावली तालुका भाजप महामंत्री म्हणून युवा नेते सचिन तंगडपल्लीवार यांचीही घोषणा करण्यात आली.सचिन तंगडपल्लीवार हे तालुक्यातील कापसी येथील आहे. गेल्या 10 वर्षांपासून ते कापसी येथे ग्रामपंचायत चे प्रभारी सरपंच, उपसरपंच,सदस्य म्हणून काम केले आहे.सावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत.तसेच भाजपा युवा मोर्चा जिल्हा संघटनेत म्हणून काम केले आहे.सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे उत्तम काम आहे.

या तीनही पदाधिकारी च्या निवडीची घोषणा होताच त्यांचे सावली तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.या निवडी बद्द पालकमंत्री तथा जेष्ठ नेते ना.सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर,माजी मंत्री शोभाताई फडणवीस, आमदार किर्तीकुमार भांगडीया,माजी खासदार अशोक नेते,माजी आमदार प्रा.अतुल देशकर,माजी आमदार ऍड.संजय धोटे,माजी आमदार सुदर्शन निमकर,जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,माजी जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे,माजी जिप अध्यक्ष संध्याताई गुरुनुले,अविनाश पाल,संजय गजपुरे, संतोष तंगडपल्लीवार,देवराव मुद्दमवार, प्रकाश गड्डमवार,दौलत भोपये,ओमदेव पा. मंगर,भालचंद्र बोदलकर,दादाजी किन्हेकार,विनोद गड्डमवार, कृष्णा राऊत,तुकाराम ठिकरे, किशोर वाकुळकर,भांडेकर, नगरसेविका नीलम सुरमवार, गुरुनुले,आशिष कार्लेकर, अशोक आकुलवार,प्रकाश खजांची,गौरव संतोषवार,राकेश विरमलवार,राकेश कोंडबतुवार, निखिल सुरमवार,विनोद धोटे,डॉ.गंगाधर धारने, मोहन चनांवार अरुण पाल,मोतीराम चिमुरकर,योगीता डबले,छाया शेंडे,छायाताई शेरकी,प्रतिभा बोबाटे,छाया चकबंडलवार,शोभा बाबनवाडे,गणपत कोठारे, दिलीप जाधव,रवींद्र बोलीवार,डॉ.कवठे,ठाकरे,मुक्तेश्वर थोराक,शरद सोनावणे,गणेश पुल्लरवार, नामदेव भोयर,भुवन सहारे,अशोक ठिकरे,दिलीप ठिकरे,जितेंद्र मस्के,विशाल करंडे, अभय लाटकर,डोप्पा बटे, देवराव चिताडे,पारस नागपुरे,विठ्ठल येगावार, अनिल माचेवार, सचिन येलट्टीवार, राकेश गोलेपल्लीवार,गोबाडे, सुरेश ढोले,जितेंद्र सोनटक्के,सदानंद किन्हेकार,राहुल लोडेलीवार,प्रसाद जक्कुलवार,इम्रान शेख,आशीष संतोषवार,मयूर गुरुनुले,मयूर व्यास,मनोज अमराजवार, सुदर्शन चामलवार,दीपक शेंडे,राजू धोटे,लोकचंद रायपुरे यांच्या सह अन्य पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते यांनी निवडी बद्दल शुभेच्छा दिल्या.








