
घराच्या चाफ्यात जेवण करीत असतांनाच अचानक आलेल्या बिबट्याने हल्ला केला आणि त्यात 3 जण जखमी झाले असून हल्ला करणाऱ्या बिबट्याला घरात कोंडून ठेवले असून या घटनेने खळबळ माजली आहे.घटनास्थळी पोलीस व वनविभाग ची टीम आलेली आहे मात्र पावसामुळे व्यत्यय येत आहे.
सावली तालुक्यातील पालेबारसा येथे सध्या बिबट व वाघाचा धुमाकूळ सुरु आहे.सावली वनपरिक्षेत्र विभागाने दोन दिवसांपूर्वीच पालेबारसा येथे ग्रामस्थांची बैठक घेवून सतर्क राहण्याची सूचना केली होती. आणि आज दुपार च्या सुमारास माधव मेश्राम यांच्या घरात बिबट घुसला त्यात त्यांना जखमी केले त्यांनां वाचविण्यासाठी गेलेल्या नेताजी कावळे व त्यांचा मुलगा लेश कावळे यांनाही बिबट्याने जखमी केले.
मात्र त्या जखमी मधेच त्यांनी घरात घुसलेल्या बिबट्याला घरातच डांबून ठेवले.आणि ग्रामस्थांना माहिती दिली.व पाथरी पोलीस व पाथरी उपवनक्षेत्र च्या कर्मचारी यांना माहिती दिली.सद्या घटनास्थळी पोलीस व वनविभाग ची चमू आहे मात्र पावसाच्या रिमझिम मुळे त्रास सहन करावा लागत आहे. वनविभाग ची चमू ही त्या बिबट्याला पिंजऱ्यात अडकविण्याच्या तयारीत आहे.वृत्त लिहे पर्यंत तिथे कारवाई सुरू होती.








