अतिवृष्टी मुळे पडझड झालेल्या घरांचे व शेतीचे लवकर पंचनामे करुन आर्थिक मदत द्या; सुरज किनेकार यांची मागणी

658

अतिवृष्टी मुळे पडझड झालेल्या घरांचे व शेतीचे लवकर पंचनामे करुन आर्थिक मदत द्या; सुरज किनेकार जिल्हासचिव भारतीय जनता पक्ष चंद्रपूर यांची मागणी

निलसनी पेडगाव (नवनित कातलवार) :-सावली तालुक्यातील नि पेडगाव शनिवार पासुन सतत रात्रभर पाडत असलेल्या पावसामुळे नि पेडगाव व भान्सी येथील घरांचे भिंती कोसळून मोठे नुकसान झाले आहे.

तिन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे नि पेडगाव, भान्सी परिसरातील आवत्या, पळे व धान रोवणी शेतामध्ये पाणी साचल्यामुळे नि पेडगाव, भान्सी या परिसराला सागराचे रुप प्राप्त झाले आहे. शेतात साचलेल्या पाण्यामुळे धान सडण्याच्या स्थितीत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत, शासनाने अतिवृष्टी ने पडझड झालेल्या घरांचे व शेतीचे लवकरात लवकर पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी सुरज किनेकार जिल्हासचिव भाजपा चंद्रपूर यांनी केली आहे.