पाथरी येथील जिप शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरा

471

 

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक दाजगाये यांची मागणी

 

जिल्हा परिषद हायस्कुल पाथरी ता. सावली जि. चंद्रपुर शाळेची चालू सत्रातील वर्ग 8 ला 71 विद्यार्थी, वर्ग 9 ला 92 विद्यार्थी वर्ग 10 वीला 76 विद्यार्थी अशी एकुण पट संख्या 239 इतकी असून 2022 23 च्या संच मान्यते नुसार वर्ग 8 वी करिता शिक्षकांची 2 पदे मंजूर आहेत एक कलेचा शिक्षक कार्यरत असून एक विज्ञान शिक्षकाचे पद रिक्त आहे. तसेच वर्ग 9 व 10 करिता तिन पदे मंजूर असून एक कलेचा व एक गणिताचा शिक्षक असे दोन शिक्षक कार्यरत असून एक कलेचा शिक्षकाचे पद रिक्त आहे.

 

त्यामुळे विज्ञान व कला शिक्षकांचे पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे चालू सत्रात शैक्षणिक नुकसान होत आहे. पंरतु मागील दोन सत्रापासून दोन तासिका शिक्षक घेऊन अध्ययन चालू आहे. यावर्षी तासिका तत्वावर शिक्षकांचे आदेश न काढल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

त आपण यावर उचित कार्यवाही करून आमच्या शाळेला दोन शिक्षकांची पुर्तता करून दयावी अशी मागणी
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक का. दाजगाये यांनी केली आहे.या संदर्भात त्यांनी वरिष्ठांना निवेदन सादर केले आहे.