शाळा प्रवेश दिन व नवागत विद्यार्थी स्वागत उत्साहात साजरा

162

रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय आणि माउंट कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आज शाळा प्रवेश दिन व नवागत विद्यार्थी स्वागत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंदा सुभाष गेडाम उपस्थित होते, तसेच प्रमुख पाहुणे संस्था सचिव ए.जी.गेडाम, संचालक प्रेम किशोर गेडाम, वेणूताई दुधे, दिगंबर कांबळे अशोक गडकरी, विशाखाताई गेडाम प्राचार्य एन.एल.शेंडे.प्र. प्राचार्य पी.जी.रामटेके, पर्यवेक्षक आर.पी.चौधरी उपस्थित होते.

सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तद्नंतर नवनिर्वाचित उपस्थित पाहुण्यांचे शाल व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.तसेच नविन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करतांना विद्यालयाद्वारा नवीन नोटबुक व पेन आणि मोफत पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आले.प्रत्येक नवीन विद्यार्थ्यांनी आपला परिचय देऊन पाहुण्यांच्या हस्ते स्वागत स्विकारले.

 

या कार्यक्रमाप्रसंगी ए.जी.गेडाम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की,जर विद्यार्थ्यांना आपला विकास घडवायचा असेल तर, त्याला अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे व इंटरनेट च्या काळात आवश्यक त्या वेळेस मोबाईल चा वापर करावा असे ठासून सांगितले,तर संचालक अशोक गडकरी यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्यात असलेल्या कलागुणांना वाव द्यावा असे आवाहन केले,

आपल्या अध्यक्षीय भाषणातून चंदाताई गेडाम यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचा पाठ वाचविला याचे कारण म्हणजे आपला शिक्षक, आपल्या शिक्षकांनी सातत्य चिकाटी आणि मार्गदर्शनातून प्रत्येक विद्यार्थ्यांना घडवत आहे, त्यामुळे आपले विद्यालय हे यशाचे शिखर गाठत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षीका व्हि.डी.मेटांगडे,तर आभार कन्नाके सर यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी शेवटी विद्यार्थ्यांना मसाला भात व गोड देण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, प्राध्यापिका,शिक्षकशिक्षिका ,व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.