शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाचे ठराव पारित
पुरोगामीचा वृक्षलागवडीचा संकल्प ठराव पारित
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा चंद्रपूर ची जिल्हा कार्यकारिणी सभा जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. सभेत एकुण ११ विषयांवर सविस्तर चर्चा करुन ठराव पारित करण्यात आले.जिल्हा सभेत औचित्य साधून महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती चे शिलेदार पदोन्नती व सरळसेवा भरती ने शिक्षण विस्तार अधिकारी व केन्द्र प्रमुख पदावर पदस्थापीत झाल्याने त्यांच्या अथक प्रयत्नांची फलश्रुतीचा गौरव व सन्मान व्हावा यासाठी सत्कार गुणीजनांचा समारंभ आयोजित केलेला होता.

सत्कार समारंभात पदोन्नती ने शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सावली येथे कार्यरत असलेले मोरेश्वर बोंडे यांचा शाल, सन्मानचिन्ह पुष्पगुच्छाने सम्मानित करण्यात आले. तसेच सरळसेवा भरती ने शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नियुक्त झालेले संदिप चौधरी,देवानंद रामगिरकर,श्वेता लांडे,विशाल बोधाने यांना शाल सन्मानचिन्ह पुष्पगुच्छाने गौरविण्यात आले. पदोन्नतीने शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदस्थापना झालेले कल्पना सिद्धमशेट्टीवार यांना शाल सन्मानचिन्ह पुष्पगुच्छाने सम्मानित करण्यात आले. केन्द्र प्रमुख पदावर पदोन्नतीने पदस्थापीत झालेले सुनिल कोहपरे,अशोक दहेलकर,शंकर धाबेकर, किशोर येनगंटीवार, जगन्नाथ वाढई,कल्पना श्रीकुंडावार,माधुरी देवगडे,अशोक राऊत यांना शाल सन्मानचिन्ह देवून सम्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्षा डा.अल्का ठाकरे, सुनिता इटनकर, गंगाधर बोढे,गणपत विधाते, रजनी मोरे,वैशाली वडेट्टीवार,सुभाष अडवे,जीवन भोयर,मनिषा मडावी, संदिप कोंडेकर, पुरुषोत्तम टोगे,लक्ष्मण खोब्रागडे, तसेच सर्व तालुकाध्यक्ष व पुरोगामी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुरेश गिलोरकर यांनी केले. आभार दिवाकर वाघे मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास मोरे,देवेंद्र गिरडकर,दिवाकर वाघे,अशोक दहेलकर, झाडे,सुरेश गिलोरकर यांनी अथक परिश्रम घेतले.








