सावली येथे खाजगी कामाकरिता आलेल्या इसमाचा परत गावाकडे जात असतांना दुचाकीला डुकराने धडक दिल्याने जखमी झाले असता उपचारा दरम्यान एकाचा मृत्यु तर दुसऱ्यावर उपचार सुरु
सविस्तर वृत्त असे की सावली तालुक्यातील उपरी येथील रहिवासी धनराज सातपुते व राजू कांबळे हे खाजगी कामाकरिता सावली येथे आले असता काम करून परत गावाकडे (उपरी ) जात असतांना चकपिरंजी जवळील क्यानल जवळ डुकराने दुचाकीला धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले असता त्यांना उपचाराकरिता सावली येथील ग्रामीण रुग्णालयात हाजर करण्यात आले परंतु दोन्ही जखमींची गंभीरता बघून त्यांना गडचिरोली येथे रेफर करण्यात आले असता गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान धनराज सातपुते यांचा मृत्यू झाले. तर राजू कांबळे याच्यावर उपचार चालू असल्याची माहिती मिळत आहे.
सदर मृतकाच्या मांगे मोठा आप्त परिवार असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरताच हळहळ व्यक्त करित आहे.








