*बल्हारशाह वनविभागाची कारवाई*
बल्हारशाह(प्रतिनिधी)-
दिनांक ०५.०६.२०२४ रोजी नियतक्षेत्र कळमणा अंतर्गत येत असलेल्या मौजा पळसगाव तेंदु गोडावुन परिसरात सश्याची वाघरी लावुन शिकार होत असल्याचे गुप्त माहिती वनपरिक्षेत्र, बल्हारशाह यांना प्राप्त झाली माहितीचे आधारे पळसगांव येथील येथील तेंदू गोडावुन चे मागील भागात सापळा रचुन आरोपी नामे १). दिलीप रामा मेश्राम, वय ३७ वर्षे, रा. गोंगले, तह. गाडी अर्जुनी, जि. गोंदिया, २) राजु काशीराम मेश्राम, वय ३९ वर्षे, रा.उमरी, तह.साकोली, जि. भंडारा, ३) भोजराम शंकर कोल्हे, वय ३४ वर्षे, रा.सोंदळ, तह. सडक अर्जुनी, जि.गोंदिया, 4) विनोद रामकृष्ण बेंडवार, वय 42 वर्षे, रा.सोंदळ, तह. सडक अर्जुनी, जि. गोंदिया, ५) सुभाष वासुदेव चन्ने, वय ४४ वर्षे, रा. सोंदळ, तह. सडक अर्जुनी, जि. गोंदिया, ६) पुरुषोत्तम मोतीराम वल्थरे, वय ४५ वर्षे, रा. किन्ही, तह. साकोली, जि. भंडारा, ७) फागु पांडुरंग शेंडे, वय ५० वर्षे, रा. किन्ही, तह. साकोली, जि. भंडारा यांना एक ससा (जखमी अवस्थेत) आणि वन्यप्राणी शिकारी फासे सह ताब्यात घेतले व सश्याला उपचार करीता वन्यजीव उपचार केंद्र, ताडोबा अंधारी व्याघ्र, चंद्रपुर येथे पाठविण्यात आले. उपचारादरम्यान सदर ससा दिनांक 06.06.2024 ला मृत पावला.
वरील आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी सस्याचे मास खाण्याकरीता ससाची शिकार केल्याची कबुली दिली. वरील सर्व आरोपी 1 ते 7 विरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 2,9, 39, 44, 51 व 52 अन्वये प्राथमिक वनगुन्हा क्रमांक अन्वये वनगुन्हा जारी करण्यात आला असुन वनगुन्हात वापरण्यात आलेले साहित्य जप्त करुन जप्तीनामा नोंदविण्यात आला व त्यानंतर आरोपींची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी न्यायालय, बल्हारपुर येथे हजर करण्यात आले. वनविभागा मार्फत सरकारी वकील अॅडव्होकेट संगीता डोंगरे हे सदर प्रकरण पाहत आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, स्वेता बोड्डु व सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह . नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत.
सदर कार्यवाही दरम्यान क्षेत्र सहाय्यक, .बी.टी.पुरी, वनरक्षक परमेश्वर आनकाडे, श्री.सुनिल नन्नावरे, मनोहर धाईत, भारती तिवाडे व रोजंदारी वनसंरक्षण मजुर यांनी सहकार्य केले.








