एस न्यूज नेटवर्क / मुल
मूल येथील तहसील कार्यालय मध्ये कॅन्टीग ची जागा ही रिकामी असून ती रिकाम्या जागेवर कॅन्टीग सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे तसेच या संदर्भातील निवेदन ही उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
मूल येथील तहसील कार्यालयाची इमारत नवीन तयार झाल्यापासून त्या ठिकाणी कॅन्टीग करिता जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे.मात्र सदर जागा अनेक दिवसांपासून रिकामी पडून आहे मात्र ती कॅन्टीग च्या उपयोगात अजूनही आणलेली नाही.याच परिसरात उपविभागीय कार्यालय आहे त्यामुळे या ठिकाणी दैनंदिन कामाकरिता मूल-सावली तसेच इतर भागातील शेतकरी, लाभार्थी,जनता आपले कार्यलयीन कामाकरिता येत असतात मात्र कार्यालयात कॅन्टीग नसल्याने नाईलाजाने मुख्य मार्गावरील पान-टपरी वर जावे लागते. तसेच कर्मचारी वर्गांना ही सुविधा उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.त्यामुळे सदर जागेवर नवीन कॅन्टीग साठी ऑनलाइन निविदा मागवून बेजरोजगार युवकांना त्यांना रोजगार उपलब्ध होईल त्या साठी ही कॅन्टीग लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी सामाजीक कार्यकर्ता सचिन मुळेवार सह बेरोजगार युवकांनी केली आहे.








