वाघ मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

2468

बल्हारशाह वनपरिक्षेत्राचे कळमना नियतवनक्षेत्रात घटना

राजुरा(संतोष कुंदोजवार)-दिनांक 08 में 2024 ला बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील कळमणा उपक्षेत्रामधील क्षेत्रीय कर्मचारी हे वनात गस्ती वर असतांना त्यांना नियतक्षेत्र कळमणा मधील वनखंड क्रमांक 571 मध्ये सकाळी 8.00 वाजताचे सुमारास वाघाचा बछडा मृता अवस्थेत आढळुन आला.

 

सदर वाघाचा बछडा ही मादि असुन तिचे वय अंदाजे 1 वर्ष होते. पुढील कार्यवाही करण्याकरीता मौका स्थळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर व राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण प्रतिनिधी श्री. बंडु धोत्रे यांना बोलावुन यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवुन वन्यप्राणी (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये प्राथमीक वनगुन्हा क्रमांक 08945/223619 दिनांक 08.05.2024 जारी करुन मृत वाघाचे बछडयाचे शव ताब्यात घेण्यात आले व शव शवविच्छेदना करीता वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे नेण्यात आले. मृत बछडयाचे शवाचे शवविच्छेदन डॉ. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी, TTC चंद्रपुर व डॉ. आनंद नेवारे, पशुवैद्यकीय अधिकारी, चंद्रपुर यांनी केले असुन सदर बछड्याचा मृत्यु मोठ्या वाघाच्या हल्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी यांनी वर्तविला आहे.

 

सदर प्रकरणात पुढील तपासा करीता मृत बछडयाचे सिलबंद नमुने घेण्यात आले असुन ते रासायनीक विश्लेषणाकरीता वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे पाठविण्यात येणार आहे.

 

या प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्रीमती. स्वेता बोड्डु व सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह . नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत. सदर कार्यवाही पुर्ण करण्याकरीता .बि.टि.पुरी, क्षेत्र सहाय्यक, कळमणा व वनरक्षक एम.जी.धाईत,.के.एस. पोडचलवार, .एस.पी. नन्नावरे व रोजंदारी वनसंरक्षण मजुर यांनी सहकार्य केले.