साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने कु.नॅन्सी श्याम वाघमारे सन्मानित

995

 

 

ओम साई विकास प्रतिष्ठान आणि बी बी सी फिल्म प्रॉडक्शन्स यांचे वतीने राष्ट्रीय पातळीवरील “ साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार सिध्द संकल्प्प लॉन साकुरी, शिर्डी येथे प्रदान करण्यात आला.

 

कुमारी नॅन्सी अंजली श्याम वाघमारे हि चंद्रपूर येथील खालसा कॉन्व्हेन्ट इयत्ता ०७ व्या वरगात पदारपण केला असुन तिला ०९/०२/२०२४ चंद्रपूर गौरव पुरस्कार, ३१/१२/२०२३ ला महाराष्ट्र कन्यारत्न पुरस्कार, तसेच छत्रपती संभाजी नगर ( औंरंगाबाद)येथे ०४/०२/२०२४ ला राष्ट्रीय सिने उत्कृष्ट बाल कला गौरव पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले.

नॅन्सी एस वाघमारे या चीमुकलिने अगदी छोट्याश्या बालपणात गरीब बिकट परिस्थितीत नृत्यामध्ये तेरा राष्ट्रीय पुरस्कार तसेच दोन आंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असून, हम है चॅम्पीयन टीव्ही रिॲलिटी शो २०२३ माडलिंग विजेती. इंडियाज बेस्ट सुपर मॉडेल टीव्ही रिॲलिटी शो आणि अनेक ट्रॉफी व क्राऊन प्राप्त करुन इवल्याश्या वयात चंद्रपूर जिल्ह्याचे नाव लौकीक केले.

 

विशेष म्हणजे मराठी सिनेमा कुंकू पुस्ल कर्जान यात बाल कलाकाराची भूमिका साकारली आहे व तो चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असुन आणखी दोन मराठी सिनेमा मध्ये निवड करण्यात आली आहे.या सर्व यशाचे श्रेय आई वडील व खालसा कॉन्व्हेन्ट चे संचालक मंडळ यांनी मोफत शिक्षण व सुट देऊन नॅन्सी च्या यशात मोलाचे सहकार्य व गुरुजनांचे मार्गदर्शन विशेष करुन सेलिब्रिटी, बॉलीवूड व टालिवुड फिल्म इंडस्ट्रीत बॅक ग्राउंड डान्सर, कोरिओ ग्राफर, मराठी सिनेमा अभिनेत्री मोठी बहिण सिमरन एस वाघमारे ला आपली आयडॉल आदर्श प्रेरणा मानते.