सावली तालुक्यात स्थानिक गुन्हे विभागाची अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाही

1939

 

9 लाख 25 हजाराचा मुद्देमाल जप्

सावली तालुक्यात गोपनीय बातमीदाराकडून माहीतीच्या आधारे पहारा देत असताना मोखाळा येथील एका संशयिताच्या घरासमोर चारचाकी वाहन उभे होते.दरम्यान वाहनाची चौकशी केली असता विक्की सुरेश गोडसेलवार याची चारचाकी गाडी आढळून आली. यात देशी।विदेश माल १ लाख २९हजार ३६० रुपयांचा असा मुद्देमाल जप्त करण्यातआलाआहे.

सावली तालुक्यात बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. मोठं मोठी परवाना धारक दुकान असले तरी यातूनच कमिशन बेसवर अवैधविक्रेते ठेवलेले असल्याचे नागरिकांच्या चर्चेतून ऐकाला येत आहे.

त्यामुळेच गोपनीय बातमीदाराच्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा -चंद्रपूर च्या वतीने शोध दिनांक 5/5 /2024 ला मोहीम सुरू केली असता आरोपी विक्की सुरेश गोडसेलवार-२७ ,मोखाळा घरासमोरील हुहाई आय -२० कंपनीची वाहन क्रमांकएम.एच.३४,मी एक- ३७७१ मधील वाहनात साठवून ठेवलेली दारू सापडली.यात १ हजार५०० नग देशी दारू,२४ घरा समोर हुहाई आय-२० कंपनीची चार चाकी वाहन कमांक एम. एच. ३४ मी. एफ. ३७७१ मध्ये अवैधरित्या देशी व विदेशी दारू वाहतुकी करीता साटवून ठेवल्याच्या खबरे वरून नमुद वाहनाची पंचा समक्ष झडती घेतली असता वाहनामध्ये १५०० नग देशी दारू, २४ नग रॉयल स्टॅग कंपनीची प्रत्येकी २,००० एम.एल. मापाने भरलेली विदेशी दारू, १०० नग रॉयल स्टैंग कंपनीची प्रत्येकी ९० एम.एल. मापाने भरलेली विदेशी, २४ नग रॉयल कंपनीची प्रत्येकी ३७५ एम.एल. मापाने भरलेली विदेशी दारू, २४ नग आयकॉनीक वाईट कंपनीची विदेशी दारू प्रत्येकी १८० एम.एल. मापाने भरलेली तसेच ४८ नग हयवर्ड ५००० कंपनीची बियर प्रत्येकी ५०० एम.एल. मापाने भरलेली असा एकुण १,२९,३६०/- रूपयाचा माल तसेच गुन्हयात वापरलेली हुडाई आय-२० कंपनीची चार चाकी वाहन कमांक एम. एच. ३४ बी. एड. ३७७१ किमंत ८,००,०००/- रूपये असा एकूण ९,२५,०००/- रुपयाचा माल जप्त केला. आरोपीस पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन, सावली यांचे ताब्यात देण्यात आले.

 

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोडावार, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल ओकरे, पोहया/८९८ जयंता चुनारकर, पोहवा /२२९६ रजनिकांत पुठ्‌ठावार, पोहवा/५३२ सतिश अवयरे, नापोशि/१२२७ चेतन गज्जलवार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.