माझी शाळा..सुंदर शाळा मध्ये प्रविणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालय तालुक्यात प्रथम

407

 

एस न्यूज नेटवर्क / सावली 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेमधून प्रवीणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालय निफंद्रा चे सावली तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याने सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

या अभियान मध्ये सावली तालुक्यातील सर्व शाळा नी सहभाग घेतलेला होता त्यातून उत्कृष्ठ पणे कार्य पार पाडीत असलेल्या
प्रवीणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालय निफंद्रा ला प्रथम क्रमांक प्राप्त झाला त्याबद्दल संस्थचे चे संस्थापक विजयराव आडेपवार व अष्टविनायक बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली चे सचिव रविंद्र आडेपवार यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र कुडकावार तसेच समस्त कर्मचारी वृंद यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व अभिनंदन करण्यात आले.शाळेला प्रथम क्रमांक मिळल्याबद्दल शिक्षक व कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.