सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त कापसी येथे वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना मोफत नोट बुक वाटप

888

 

भारतीय जनता पार्टी कापसी च्या वतीने जि. प. शाळा कापसी येथे राज्याचे वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय माजी मंत्री तथा माजी पालकमंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेकडो विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप करणात आले. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागदेवतेचे पुजन करण्यात आले व वृक्षरोपण करण्यात आले.

कापसी येथे गेल्या 10 वर्षांपासून सुधीरभाऊ मुनगंटीवार व प्रा.अतुलभाऊ देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येते.

यावेळी भाजपा चे नेते,अर्थ व नियोजन बांधकाम माजी सभापती जि. प. चंद्रपुर, माजी सभापती पं. समिती सावली रवींद्र बोलीवार,सावली कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ,माजी प्र.सरपंच तथा सदस्य ग्राम पंचायत, कापसी सचिनदादा तंगडपल्लीवार, श्री. दिवती बुरांडे सदस्य या. पं. कापसी, उज्वला प्रदिप सातपूर्व अध्यक्ष शाळा व्यवस्थापन कमेटी कापसी, दिलीपभाऊ मंडलवार, ज्ञानेश्वरभाऊ भांडेकर ,प्रदीप चलाख, गणेशजी कोळे, संतोषजी भांडेकर, गणेशजी पिपरे, अमितजी चांडेकर, सुरेखा व. भांडेकर, अनिष मेश्राम यांच्या उपस्थितीने हा सोहळा पार पडला.
तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.