आताचे ब्रेकिंग न्यूज
सावलीच्या नगराध्यक्ष लता लाकडे यांनी दिला जिल्हाधिकाऱ्याकडे राजीनामा
सावली नगरपंचायतच्या गेल्या 3 वर्ष 3 महिन्यापासून नगराध्यक्ष पदावर विराजमान असलेल्या लताताई लाकडे यांनी आज आपल्या नगराध्यक्ष पदाचा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे तडका फडकी राजीनामा दिलेला आहे. त्यांच्या राजीनामेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या आठवड्यात या क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कडे सावली येथील सर्व नगरसेवकांची बैठक झाली.त्यात अनेकांनी नगराध्यक्ष लताताई लाकडे यांच्या कालावधी झाल्याने राजीनामा द्यावा असे म्हटले होते. त्यामुळे वडेट्टीवार यांच्यावर ही अनपेक्षित दबाव होताच.अडीच वर्षाचा कालावधी झाल्यावर राजीनामा देणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र विधानसभा निवडणुक असल्याने आमदार विजय वडेट्टीवार यांनीच राजीनामा देण्याची आवश्यकता नाही असे म्हणून नगराध्यक्ष लताताई लाकडे यांना अभय दिला होता तसेच विजयभाऊ यांच्या विजयासाठी लताताई लाकडे यांनी अथक परिश्रम घेतले होते. व मोठे मताधिक्य मिळवून दिले होते.व पक्षाचा विस्तारही वाढविला होता. आता निवडणुकीच्या सहा महिन्यानंतर अखेर नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची वेळ अखेर लताताई लाकडे यांच्या वर आली.
मात्र राजीनामा मागील कारणे काय? याचा वर सध्या विविध चर्चा सुरू असून मी स्वतःहून राजीनामा दिल्याचे प्रतिक्रिया लताताई लाकडे यांनी दिलेली आहे.








