शिक्षकांत दुःखाचे वातावरण;शोककळा

पूर्वी पंचायत समिती चामोर्शी येथे कार्यरत असणारे व आंतरजिल्हा बदलीने सावली पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेवरा येथे कार्यरत असणारे सदानंद अबदागिरे प्राथमिक शिक्षक आहे.तालुक्यातील गेवरा येथे नुकतीच त्यांची बदली झाली होती.यांचा आज दिनांक 6 ला रात्रो ८ वाजता दरम्यान दर्शनी माल चामोर्शी जवळ दुचाकी ला बोलोरोने जोरदार धडक दिली यात अपघाती निधन झाले. ते मुळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे कळते आहे.त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शिक्षका मध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे.