दि. २६ जानेवारी २०२५ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भागी/शिरपूर येथे प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण सोहळा व सायंकाळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सकाळी शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. लेकचंदजी राऊत यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या संध्याकाळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सुप्त गुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भागी/ शिर. ता. देवरी जिल्हा. गोंदिया येथे स्नेसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसोबतच पालकवर्गसुद्धा अतिशय उत्साहात होते.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून श्री. लेकचंदजी राऊत अध्यक्ष, शा. व्य. स., सौ. कुसुमताई ओंकार उपाध्यक्ष शा. व्य. स., सौ. पुष्पाताई राऊत सरपंच, ग्रा. पं. भागी/शिर., सौ. वंदनाताई कापसे पो. पा. भागी, श्री. अर्जुनजी भोयर उपसरपंच, ग्रा. पं. भागी/शिर., सौ प्रतिभाताई कोरोंडे पो.पा. शिरपूर, श्री. ईश्र्वरजी भोयर अध्यक्ष तं. मु. स., सौ. के. पी भांडारकर मॅडम, मुख्याध्यापिका, जि. प. प्रा. शा, भागी/शि., व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
उद्घाटनीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. जनकलाल राऊत ह्यांनी तर सूत्रसंचालन श्री. रविंद्रजी भोयर माजी उपसरपंच ह्यांनी व आभारप्रदर्शन शाळेचे शिक्षक श्री. टी. के गणविर सर ह्यांनी केले.
शाळेत स्नेहसंमेलन होत असल्याने गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. ओमराजजी राऊत, सुनील मडावी, विलास मासरकर, विश्वनाथ भोयर, युवराज फापनवाडे, विलास ओंकार, शिवकुमार राऊत, सदारामजी कोसरे, प्रकाशजी वालदे, किशोरजी राऊत, शिलाताई राऊत, प्रेमलालजी मोटघरे, जयपालजी वालदे, प्रमोद वालदे, सौ. रंजना किरसान, सौ. भूमीता गावराने , जयपालजी कोसरे, भिमराज गावळ, पार्थवकुमार राऊत, भारत राऊत, बाळकृष्ण गावळ, महेश मसे, अमित राऊत, हंसराज ओंकार, दुर्योधन राऊत, स्वप्नील भोयर, मनीष भोयर, कुंवरलाल कोसरे, अरुण भोयर व समस्त भागीवासीय नागरिक ह्यांनी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीत, गोंडी, छत्तीसगढी गीत, मराठी गीत ह्यांवर अतिशय सुरेख नृत्यांचे सादरीकरण केले.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या शेवटी पालकांनी व स्थानिक ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेने भोजनदान दिले.
कार्यक्रमाची सांगता श्री. लेकचंदजी राऊत, सौ. पुष्पाताई राऊत व श्री. रविंद्रजी भोयर यांचे कडून सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वितरीत करून करण्यात आली.








