मूल येथे 12 जानेवारी ला सहकारी पतसंस्था कर्मचारी संघटनेचे प्रथम त्रैवार्षिक अधिवेशन

142

 

मुल(तालुका प्रतिनिधी) विदर्भ नागरी / ग्रामीण बिगरसोती सहकारी पतसंस्था कर्मचारी संघ नोंदणी क्रमांक -एनपीजी – ५६५७ सलग्न भारतीय मजदुर संघ च्या वतीने दिनांक १२ जानेवारी रविवार ला सकाळी ११.३० वाजता डॉ. हेडगेवार सभागृह धनश्री नागरी सहकारी पतसंस्था मुल येथे सहकारी पतसंस्था कर्मचारी संघटनेच्या प्रथम त्रैवार्षिक अधिवेशन आयोजन करण्यात आले आहे.

 

राज्यातील आर्थिक क्षेत्राचा आर्थिक कणा असलेल्या सहकारी पतसंस्था कर्मचारी संघटनेच्या प्रथम त्रैवार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने या अधिवेशनाचे उद्‌घाटन भामस नई दिल्ली अ. भा. उपाध्यक्ष नीता चौबे करणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भामस विदर्भ प्रांत प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार, भामस चंद्रपूर गडचिरोली विभाग संघटन मत्री हेमराज गेडे, भामस चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष बंडू हिवरे, भामस चंद्रपूर जिल्हा मंत्री पवण ढवळे, ना. बी. सह. पत. कर्म. संघ / वि. ग्रा. अध्यक्ष अशोक पिसे, ना. बी. सह. पत. कम. संघ / वि. ग्रा. उपाध्यक्ष तुकाराम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

या अधिवेशनाच्या निमित्ताने सहकारी पतसंस्था मध्ये कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवी दिशा व बळ मिळेल याच उद्देशाने अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाला देशातील सर्वात मोठ्या ट्रेड युनियन असलेल्या भारतीय मजदूर संघाचे गणमान्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. तरी जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था कर्मचाऱ्यांनी अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन सहकारी पतसंस्था मूल तालुका प्रमुख संतोष शनगरवार यांनी केले आहे.