आत्ताची ब्रेकिंग न्यूज…. छत्तीसगड मधून येणारा अवैध मजा चा ट्रक चेक पोस्ट वर पकडला लाखों चा मजा जप्त; 2 आरोपी ताब्यात

2401

 

सद्या निवडणूकीची धामधूम सुरू झालेली आहे आणि त्यानिमित्ताने सद्या सर्वत्र तपासणी साठी चेक पोस्ट लावण्यात आलेले आहे. सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे तपासणी नाका लावण्यात आलेला आहे.या नाक्यावर आज सकाळी तपासणी साठी छत्तीसगड येथील एका ट्रक ची पाहणी केली.आधी ड्रायव्हर ने उडवा उडवी ची उत्तरे दिली मात्र नाक्यावरील तपासणी अधिकारी यांनी ट्रक तपासला असता धक्का बसला.त्यात लाखों रुपयांचा अवैध मजा असल्याचे दिसून आले.त्यानंतर सदर ट्रक हा सावली येथील पोलीस स्टेशन ला जमा करण्यात आला आणि ट्रक मधील पेट्या ची मोजणी केली असता लाखो रुपयांचा मजा दिसून आलेला आहे.मजा वर महाराष्ट्र मध्ये बंदी आहे तसेच हा मजा सावली मार्गे हैदराबाद ला जाणार असल्याचे कळते आहे.

सदर नेमकं काय प्रकार आहे याची संपूर्ण तपासणी पोलीस विभाग करीत आहे वृत्त लिहेपर्यंत तपासणी सुरू होती. याबाबत लवकरच सविस्तर वृत्त प्रकाशित करू.