
महाराष्ट्र राज्यातील महामंडळ मध्ये महत्त्वाचे मंडळ असलेले वनविकास महामंडळ च्या उपाध्यक्ष पदावर ब्रम्हपुरी-सावली विधान सभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांची निवड करण्यात आल्याची माहीती राज्यसरकार कडून देण्यात आलेली आहे.

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील सोज्वळ नेता म्हणून ज्यांची ख्याती आहे त्यात प्रा.अतुलभाऊ देशकर यांचे नाव प्रथम आहे.कार्यकर्त्या सोबत नेहमी आपुलकी ने बोलणारे व दांडगा जनसंपर्क असलेले नेते आहे.या पूर्वी ते याच क्षेत्रातून 10 वर्ष आमदार होते तसेच भाजपा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदावर अनेक वर्षे होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीकरिता भाजपा कडून उमेदवारी मागत असतांनाच त्यांना महामंडळ ची लॉटरी लागली मात्र ही लॉटरी आहे का निवडणूकी पूर्ती बोळवण हे येणारी वेळच सांगेल.
माजी आमदार अतुल देशकर यांच्या नियुक्ती बद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.भाऊंना पद मिळाल्याचा अनेकांनी आंनद व्यक्त केला आहे.