शेतीचे मोठे नुकसान;पंचनामा करून भरपाई द्या
हरंबा(मोहित मुद्दमवार)
सावली तालुक्यातील डोनाळा व हरंबा या वनक्षेत्र परिषदेमध्ये गेले काही दिवसांपासून हत्तीचा एक धुमाकूळ चालू असल्याचा दिसून येत आहे हत्ती येथे वास्तव्य करून बसलेला आहे याच्या पहिले सामदा वाघोली या भागामध्ये शेतीचा नुकसान करून हे कापशीच्या जंगलातून डोनाळा हरंबा वनशेत्र मध्ये आलेले आहेत. तर डोनाळा अनेक शेतकऱ्यांचे शेतामध्ये जाऊन शेताची खूप अशी मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेली आहे.

या वारंवार होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरी हा हवालदार झालेला आहे त्याच्यामुळे या शेतातील लवकरात लवकर पंचनामे व्हावे आणि त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे आणि त्या हत्तीचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा.








