सावली(सूरज बोम्मावार)
सावली तालुक्यातील ढिवर समाजाचा मोठा नेता भाजपाचा माजी पंचायत समिती सभापती कृष्णा राऊत यांनी अखेर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा वर विश्वास ठेवून कांग्रेस मध्ये प्रवेश केला.
आठ दिवसांपूर्वीच महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा सावली येथे पार पाडला त्यात भाषणाचा वेळी त्यांनी वडेट्टीवार यांचे नेतृत्व मान्य केले आणि तोंड भरून कौतुक केले होते.त्यामुळे कांग्रेस प्रवेश होईल अशी चर्चा होती. भाजपा सोडून जावू नये या साठी अनेकांनी प्रयत्न केले होते.मात्र कांग्रेस मध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी अखेर आज दिनांक 3 ला ब्रह्मपुरी येथील वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी घेतला यावेळी त्यांच्या सोबत 100 समर्थक सह त्यांनी ही प्रवेश केला.
कृष्णा राऊत हे युवा दशेपासून राजकारणात आहे.उत्कृष्ट भाषण देण्याची कला त्याच्यात आहे तसेच सामाजिक बांधणीत त्यांचा मोठा वाटा आहे.समाज एक समाज अशी त्यांची नेहमी भूमिका राहिली आहे. ढिवर समाजाला राजकिय वलय मिळावा यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले. ग्रामपंचायत सदस्य निवडुन येत त्यांनी उपसरपंच झाले.त्यानंतर पंचायत समिती ची निवडणूक बसपा तर्फे लढवत त्यांनी त्यावेळी विजय मूत्यालवार व मनीष बोमनवार यांचा पराभव करीत विजयी झाले त्यांनतर त्यांनी भाजपात प्रवेश केला.त्यानंतर भाजपा ने उपसभापती, सभापती पद दिले तसेच जेष्ठ कांग्रेस नेते संदीप गड्डमवार यांच्या विरोधात जिल्हा परिषद मध्ये निवडणूक लढली मात्र त्यात पराभव झाला.मात्र भाजपा सोबत ते नेहमीच सोबत होते.मात्र एन टी करीता घरकुल योजना आणण्यात आमदार विजय वडेट्टीवार यांनी मोलाची भुमीका केली त्यामुळे मी मला आनंद आहे त्यामुळे कुठल्याही पदाची अपेक्षा न करता नेतृत्व मान्य करीत वडेट्टीवार यांच्या समोर कृष्णा राऊत यांनी कांग्रेस चा दुपट्टा गड्यात टाकला.

कृष्णा राऊत यांच्या कांग्रेस मध्ये प्रवेश व्हावा या साठी वडेट्टीवार यांनी अनेक दिवसांपासून फिल्डींग लावली होती त्यामुळे अखेर वडेट्टीवार यांच्या जाळ्यात भाजपाचा कृष्णा राऊत मासा अडकला असेच आज झाले.
कृष्णा राऊत यांना वैयक्तिक काहीही कमी पडू देणार नाही असा शब्द वडेट्टीवार यांनी दिल्याची माहिती आहे.तसेच लवकरच राऊत यांच्या कडे पक्ष संघटनेची जबाबदारी येणार असून भविष्यात पुढे होणाऱ्या नगरपंचायत च्या निवडणूकी मध्ये नगराध्यक्ष पदाचा चेहरा करण्याची शक्यता आहे.अशी चर्चा कांग्रेस वर्तुळात व्यक्त केल्या जात आहे.








