रुग्णाना फळ वाटप ,वृक्षरोपण करून फार्मसी डे साजरा
जागतिक फार्मासिस्ट दिवसाची स्थापना आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशन (FIP) द्वारे 2009 मध्ये जागतिक आरोग्य सुधारण्यासाठी फार्मासिस्टच्या महत्त्वपूर्ण भूमिकेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि समर्थन करण्यासाठी करण्यात आली. हा दिवस जागतिक आरोग्य राखण्यासाठी आणि सुधारण्यात फार्मासिस्टच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करण्यासाठी, 25 सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा केला जातो.

सावली तालुक्यातील केमिस्ट आणी ड्रगिस्ट च्या वतीने आज जागतिक फार्मसी डे दिवसाचे औचित्य साधून नवीन बस स्टॉप समोर व्यंकटेश कॉम्प्लेक्स येथे कार्यक्रम घेण्यात आला यां कार्यक्रमात जिल्ह्याचे केमिस्ट सचिव जितूभाऊ राजा ,केमिस्ट संघटक सचिव जयंत दांडेकर ,जिल्हचे माजी अध्यक्ष सुधीर भास्करवार उपस्थित होते यां मान्यवरांचा सावली तालुका केमिस्ट तर्फ शाल आणी श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांच्या उपस्थितीत फार्माशिष्ट ओत घेण्यात आली नंतर उपस्थितांकडून फार्मसी विषयी तालुक्याच्या केमिस्ट ना मोलाचे मार्गदर्शन दिले आणी यांच्या उपस्थितीत केमिस्ट तालुकाअध्यक्ष गजानन टोनगे आणी सचिव रवींद्र ताटकोंडावार यांच्या तर्फे सर्व तालुक्याच्या केमिस्टना बॅच व अपरान वाटप करण्यात आले तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णाना फळ वाटप व व्रुशरोपण काळाची गरज समजून रुग्णालयाच्या परिसरात वृक्ष रोपण करण्यात आला दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा फार्मसी डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .यां कार्यक्रमातील मान्यवरांचे आभार सौ रुचिता ताटकोंडावार यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करिता सावली तालुक्याचे सर्व बांधव उपस्थित होते








