अवैध दारू विक्रेत्यांच्या दारूला महिलांनी लावल्या आगी;अवैध दारूविरोधात महिलांचा एल्गार

2094

महिलांचा दारूविरोधात एल्गार अवैध दारू विक्रेत्यांची दारूला महिलांनी लावल्या आगी

सावली saoli तालुक्यातील गेवरा बुजरूक gevra येथे 3 अवैध दारू विक्रेत्यांच्या घरावर महिलांनी एकत्र येत दारू पकडली व त्या दारूला आग लावून पोलीस प्रशासनाचा निषेध केल्याची घटना दिनांक 23 ला सायंकाळ च्या सुमारास घडली आहे.आणि आज दुसऱ्यादिवशी ही पुन्हा एका दारू विक्रते च्या घरून पुन्हा दारू साठा पकडल्याने पाथरी pathari पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

सावली तालुक्यातील#pathati पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गेवराबूज या गावात सध्या अवैध दारू विक्रीच्या महापूर सुरु असून या दारूच्यामहापूर विरोधात तेथील स्थानिक महिलांनीच#yelgar एल्गार पुकारलेला आहे.दिनांक 23 ला सायंकाळी च्या सुमारास गेवरा बुज, रामनगर या दोन्हीही ठिकाणी महिलांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी टाकून दारूच्या शेकडो बाटल्या जप्त केल्या आणि सदर पकडली दारू चौकात आणून त्याचा दारूला आगी लावून दिल्या व अवैध दारु विक्रेत्यांना पाठबळ देणाऱ्यांचा निषेध केला.

 

गेवरा या परिसरात अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारूची विक्री सुरू आहे येथील महिलांनी अनेकदा या संदर्भातून पाथरी पोलिसांना माहिती सुद्धा दिली मात्र पोलिसांनी सपशेल या ठिकाणी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. रामनगर या परिसरात गेवरा पोलीस चौकी सुद्धा आहे.दोन अवैध दारू विक्रेते याच परिसरात दारू विकत असतात तसेच गावात एक जण विक्रेता आहे.मात्र दुर्लक्ष करीत असल्याने गावातील महिला मंडळ एकत्र येत दारूविक्रेत्यांच्या घरी धाडी टाकायला सुरुवात केली आहे.

 

पोलिसांनी या घटनेकडे गंभीरपणे घेत नसल्याचे दिसून आहे.काल ज्यांची दारू महिलांनी पकडली त्यापैकी एक विक्रेता आज दुपार पासून पुन्हा खिशात बॉटल आणून विकत होता अशी माहिती मिळताच शेतातुन काम करून आल्यानंतर महिला आज सायंकाळी पुन्हा एकत्र येत दारू विक्रेत्याला पकडले असून त्याच्या कडून 5 ते 6 पेट्या जप्त केल्याचे बोलले जात आहे.

या परिसरात दारू चे दुकान नाही मात्र हळदा #halda येथील एक अवैध दारू विक्रेता हा गेवरा व परिसरात अवैध दारूचा पुरवठा करीत असल्याचे बोलले जात आहे.मात्र पाथरी पोलीस दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे #sdpo पोलीस उपविभागीय अधिकारी व #sp  पोलीस अधीक्षक या गंभीर बाबी कडे लक्ष देणार का?असा प्रश्न या ठिकाणच्या महिला विचारू लागल्या आहेत.