सावली तालुक्यातील ‘त्या’सरपंचावर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

3121

अटकेच्या भीतीपोटी सरपंच फरार?

सावली तालुक्यातील अंतरगाव येथील पाणी चे टाकी चे काम हे जुन्या जागेवर न करता नवीन जागेवर करा असा ठराव असतांना काम सुरू केले मात्र याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या माजी ग्रामपंचायत सदस्य सहित सामाजिक कार्यकर्ते व काही ग्रामस्थांना अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ केल्यानें सरपंच कवेंद्र लाकडे यांची पोलिसात तक्रार देण्यात आली.त्यावरून त्यांच्या वर अधिनियम भारतीय न्याय संहिता 2023 कलम 296(b),351(3),अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 -3(1)R, व S अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून सरपंच फरार झालेले आहेत.

 

विजय दामाजी ढोलणे माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या पोलिसात दिलेल्या तक्रारी वरून असे म्हटले की,
मी सन 1995 ते 2000 कालावधी पर्यंत सदस्य होतो. सन 2023 मध्ये जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाण्याची टाकीचे बांधकाम मंजुर झाल्याने टाकीचे बांधकामाबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र अंतरगाव येथे कोणतेही कागदोपत्री पुरतता न करता बांधकामास सुरुवात केली, सदर बांधकामास गावकऱ्यांचे विरोध असल्याने दि. 30/05/2024 रोजी ग्रामसभेत सर्वानुमते टाकीसाठी पर्यायी जागेची व्यवस्था गावातील आगरबोडी किंवा जुन्या पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी करण्यात यावी. याबाबत तराव सुद्धा घेण्यात आले आहे. दि. 15/07/2024 रोजी 11/30 वा. सरपंच अंतरगाव कविंद्र देवाजी लाकडे यांनी जल जीवन मिशनचे योजनेचे इंजिनियर व ठेकेदार सोबत मिळुन बंद असलेले सार्वजनिक टाकी बांधकामास सुरुवात केल्याचे लक्षात आले. तेव्हा माझ्यासोबत गावातील लोकांनी बांधकाम स्थळी भेट दिली.

 

मी आमचे गावातील सरपंच कविंद्र लाकडे यांना फोन केला व त्यांना तुम्ही टाकीचे बांधकाम केले तर परमिशन आहे का असे विचारले. तर त्यांनी मला फोनवरच “टाकी बांधकामा करिता कलेक्टर साहेबांचे आदेश आहे तुम्ही ग्रामपंचायत मध्ये या मी आदेशाची प्रत दाखवतो असे फोनवर म्हणाल्याने. मी स्वप्नील मधुसदन पेटकर, विजय नामदेव आंसमवार असे सदरची आदेशाची प्रत पाहण्यास ग्रामपंचायत कार्यालयात गेलो. तेव्हा ग्रामपंचायत मध्ये दाखल्याकरिता तेथे बरेच लोक आले होते. आम्ही ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर तेथे सरपंच कविंद्र देवाजी लाकडे हजर होते.

 

तेव्हा मी त्यांना पाण्याचे टाकीचे बांधकामाचे आदेशाची प्रत दाखवा असे म्हणालो असता. सरपंचाने आदेशाची प्रत घरी आहे असे म्हणाले. तेव्हा आम्ही त्यात आम्हाला कशाला बोलाविले असे म्हणालो असता. सरपंच यांनी आम्हाला अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केली व पुन्हा ग्रामपंचायत मध्ये येशील तर साल्या कांदवळ्या जिवंत मारुन गाळुन देईन मला जेल झाली तरी चालेल अश्या शब्दात शिवीगाळी केली. तसेच माझ्यासोबत असलेले स्वप्नील मधुसदन पेटकर, विजय नामदेव आंसमवार यांना ही शिवीगाळ करीत विजय नामदेव आसनवार यांची कॉलर पकडली. तेव्हा तेथे हजर असलेले किशोर विनायक संगिडवार, मंगेश अशोक ठाकरे यांनी मध्यस्थी करुन सरपंचाला समजवण्याच प्रयत्न केला.

 

तरी सरपंच कविंद्र देवाजी लाकडे रा. अंतरगाव टोला ता. सावली जि. चंद्रपूर यांचेवर कार्यवाही होणेस स्वप्नील मधुसदन पेटकर, विजय नामदेव आंसमवार यांच्या सह विजय ढोलने यांनी पाथरी पो.स्टे. ला येऊन मी तोंडी रिपोर्ट देत आहे. हिच माझी तोंडी रिपोर्ट दिली असे म्हटले.

 

त्यावरून पोलिसांनी अधिनियम भारतीय न्याय संहिता 2023 कलम 296(b),351(3),अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 -3(1)R, व S अंतर्गत गुन्हा दाखल केले असून कारवाई च्या भीतीने सरपंच कवेंद्र लाकडे हे फरार असल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहे.