माजी सभापती संतोष तंगडपल्लीवार यांच्या प्रयत्नातून कापसी-व्याहाडबुज -डोनाळा येथे 44 लाखांचे आरो प्लँट मंजूर

524

आपल्या क्षेत्रातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे हाच उदात्त हेतू ठेवून या क्षेत्रातील लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य तथा माजी जिप बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार यांनी विविध विकास कामे सोबतच व्याहाड बुज,कापसी,डोनाळा या तीन गावाकरिता चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वने, कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याने संतोष तंगड़पल्लीवार माजी बांधकाम सभापती चंद्रपुर यांच्या प्रयत्नातुन मौजा कापसी येथे जिल्हा खनिज निधी अंतर्गत पाणी शुद्धिकरण सयंत्र RO प्लान्ट मंजूर करण्यात आले.त्याकरिता निधी व्याहड बुज करीता 15 लाख ₹,कापसी करिता 15 लाख ₹ ,डोनाळा करीता 14 लाख ₹ मंजूर करून कामाला सुरुवात करण्यात आली आहे.या कामाचे तंगडपल्लीवार यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

आज कापसी येथे माजी जिप सभापती संतोष तंगलपल्लीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ. सुनीताताई दिवाकर काचीनवार,सरपंच माजी प्र. सरपंच तथा सदस्य सचिन तंगड़पल्लीवार,ढीवरू बुरांडे ग्राम. सदस्य कापसी,हिवराज खोबरागड़े ग्राम. सदस्य, मांदाडे ग्रामसेवक , प्रदीप चलाख अध्यक्ष शा. व्य स. कापसी, संतोष भांडेकर भाजपा सामाजिक कार्यकते, सचिन भोयर , जितेंद्र पिपरे आदी जण उपस्थित होते.